शहा विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहा विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
शहा विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

शहा विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

sakal_logo
By

गुळूंचे, ता.१३ : येथील (ता.पुरंदर) रयत संकुलातील लीलावती रिखवलाल शहा कन्या विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
गुरुविषयी आदर दर्शवणारा हा सण, जीवनाच्या प्रत्येक वाटेवर योग्य गुरुची साथ असेल तर आयुष्य यशस्वी होते. गुरुचे आयुष्यातील स्थान पुरातन काळापासून वंदनीय मानले गेले आहे असे मार्गदर्शन विद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता पासलकर यांनी विद्यार्थिनींना केले.
गुरूंची जाणीव मनात ठेवून गुरुविषयी आदर व्यक्त करण्यासाठी शहा कन्या विद्यालयात उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. सर्वात प्रथम विद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता पासलकर, पर्यवेक्षक उत्तम लोकरे आणि सर्व सेवकांनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी विविध पद्धतीने सुंदर शुभेच्छापत्र तयार केली होती ती शुभेच्छापत्रे शाळेतील शिक्षकांना देण्यात आली.
विद्यार्थिनींनी गुरुचे महत्त्व दर्शवण्यासाठी सुंदर भाषणे केली इयत्ता दहावीमधील राणी मोरे, सृष्टी शेंडगे, यशस्वी जाधव या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाची तयारी केली. यावेळी विद्यालयातील शीतल शिंदे, रूपाली रणनवरे, संजय भोसले, सपना ओव्हाळ, अश्विनी खोपे, ज्ञानेश्वर जाधव व सर्व सेवक वर्ग उपस्थित होते.

01049

Web Title: Todays Latest District Marathi News Gln22b00506 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top