गुळुंचे येथील कारवाईत ३३ लाखांचा गुटखा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुळुंचे येथील कारवाईत 
३३ लाखांचा गुटखा जप्त
गुळुंचे येथील कारवाईत ३३ लाखांचा गुटखा जप्त

गुळुंचे येथील कारवाईत ३३ लाखांचा गुटखा जप्त

sakal_logo
By

गुळुंचे, ता. १४ : नीरा-मोरगाव रस्त्यावरील गुळुंचे (ता. पुरंदर) येथील रुपाडीच्या माळ येथे चढावर ३३ लाखांचा गुटखा जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. १४) पहाटे चारच्या सुमारास सहायक फौजदार सुदर्शन होळकर यांना गोपनीय बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, आयशर टेम्पो (क्र. एमएच १३ सीयू ४३४५) अवैध गुटखा घेऊन निघाला आहे. पोलिसांनी पाठलाग करून रूपाडीच्या माळाच्या चढावर टेम्पो थांबवला. टेम्पो चालक दावलमलीक हुसेनसाब चौधरी (वय २१, रा. जळकवेट्टी, ता. अथनी, जि. बेळगाव, कर्नाटक) व अरीफ हुसेन रोहिले (वय ३७, रा. मिरज, जि. सांगली) यांच्याकडे चौकशी केली, परंतु त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना ताब्यात घेऊन टेम्पो नीरा पोलिसांनी पोलिस दुरक्षेत्रात आणला व टेम्पोची पाहणी केली असता टेंपोमध्ये हिरा पान मसाला नावाचा गुटखा सुमारे २१ लाख ४५ हजारांचा व रॉयल ७१७ नावाची सुगंधी तंबाखू सुमारे ११ लाख ५५ हजारांची, असा माल असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी वरील माल व वाहन १० लाख रुपये, असा एकूण ४३ लाखांचा अवैध गुटखा वाहनासहित जप्त केला.

Web Title: Todays Latest District Marathi News Gln22b00520 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..