नीरा येथे सीसीटीव्हीचे लोकार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नीरा येथे सीसीटीव्हीचे लोकार्पण
नीरा येथे सीसीटीव्हीचे लोकार्पण

नीरा येथे सीसीटीव्हीचे लोकार्पण

sakal_logo
By

गुळुंचे, ता.२४ : नीरा (ता.पुरंदर) येथील ग्रामपंचायत नीरा शिवतक्रारच्या वतीने १५ व्या वित्त आयोगातून सीसीटीव्ही बसविण्यात आले. त्याचे लोकार्पण बुधवारी (ता.२४) खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
नीरेतील शिवाजी चौक व आवश्यक ठिकाणी एकूण २२ कॅमेरे बसविण्यात आले असून यासाठी सुमारे ६ लाख ४५ हजार रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती सरपंच तेजश्री काकडे यांनी दिली. दरम्यान, सुळे यांनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बांधकामाची पाहणी केली यावेळी उपसरपंच राजेश काकडे यांनी शाळेच्या बांधकामासंबंधी सविस्तर माहिती दिली. यावेळी माजी आमदार अशोक टेकवडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे, माणिक झेंडे पाटील, विजय कोलते, सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, माजी जिल्हा परिषद सभापती दत्ता चव्हाण, रेखा चव्हाण, विराज काकडे,ग्रामसेवक मनोज डेरे, लक्ष्मण चव्हाण, राजेश चव्हाण, गौरी कुंजीर, भारती शेवाळे, राजेंद्र बरकडे, सविता बरकडे, अजित सोनवणे, ॲड.आदेश गिरमे, कोमल निगडे आदी उपस्थित होते.

01089

Web Title: Todays Latest District Marathi News Gln22b00523 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..