गुळुंचे येथील शाळेत मुलींनी धरला फेर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुळुंचे येथील शाळेत 
मुलींनी धरला फेर
गुळुंचे येथील शाळेत मुलींनी धरला फेर

गुळुंचे येथील शाळेत मुलींनी धरला फेर

sakal_logo
By

गुळुंचे, ता. ४ ः गुळुंचे (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भोंडल्याचे व परिसर सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऐलमा पैलमा गणेश देवा...., एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू...., अक्कण माती चिकन माती.... अशी भोंडल्यावर आधारित गाणी म्हणत व टिपऱ्या खेळत मुलींनी फेर धरला होता.
यावेळी फळ्यावर हत्तीचे चित्र काढून त्याची पूजा करण्यात आली. विद्यार्थ्यांसोबत, महिला पालक व शिक्षकांनीही भोंडल्यात फेर धरत दांडिया खेळल्या. यावेळी अंगणवाडीचे विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम संपल्यावर विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या खिरापतीचे वाटप केले. तसेच उपशिक्षिका सारिका मदने व मीनाक्षी भगत यांनी विद्यार्थ्यांना जिलबीचे वाटप केले. त्यानंतर मुलांची परिसर सहल काढण्यात आली. नवरात्रोत्सवानिमित्त येथील तुकाईमाता दर्शनासाठी तुकाईच्या डोंगरावर सहल काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी सहलीचा मनसोक्त आनंद लुटला. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक दीपक अधटराव, सारिका मदने, सचिन भोसले व मीनाक्षी भगत यांनी केले.