नीरा येथील पाणी योजना भाजपच्याच प्रयत्नातून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नीरा येथील पाणी योजना
भाजपच्याच प्रयत्नातून
नीरा येथील पाणी योजना भाजपच्याच प्रयत्नातून

नीरा येथील पाणी योजना भाजपच्याच प्रयत्नातून

sakal_logo
By

गुळुंचे, ता. १४ : नीरा-शिवतक्रार गावासाठी नुकतीच मंजूर झालेली पाणीपुरवठा योजना महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सहकार्याने मंजूर झाल्याची माहिती दिशाभूल करणारी असून, प्रत्यक्षात योजना सुरू व्हावी, यासाठी नीरा शहर भाजपच्या वतीने २० फेब्रुवारी २०१८ पासून प्रयत्न सुरू होते. यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले असून, ही योजना भाजपच्या प्रयत्नाने मंजूर झाली आहे. मात्र, स्थानिक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या योजनेचे श्रेय मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष सचिन लंबाते यांनी केला.
नीरा गावासाठी जलजीवन मिशनअंतर्गत पाणी पुरवठा योजनेअंतर्गत ४१ कोटी ५८ लाख ६७ हजार ९४८ रुपयांचा निधी नुकताच मंजूर झाला आहे. तांत्रिक मान्यता मिळाल्यावर सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी या योजनेसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे तसेच विद्यमान आमदार संजय जगताप यांचे सहकार्य मिळाल्याचे नमूद करीत विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारचे देखील आभार मानले होते. त्यानंतर भाजपाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी लंबाते बोलत होते. यावेळी श्‍यामराजे कुंभार, बाळासाहेब भोसले, निलम कुदळे, सुरेंद्र जेधे, राधा माने, भाऊ कुदळे, योगेंद्र माने, प्रवीण पटेल, मच्छिंद्र लकडे, अशोक जोशी, सतीश दुर्वे, कल्पना पटेल, रामदास वाघ, अरविंद जेधे, तात्या सासवडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी उपसरपंच बाळासाहेब भोसले म्हणाले, ‘‘जलजीवन मिशन ही केंद्र व राज्य शासनाची योजना आहे. नीरेकर सुज्ञ असून, त्यांच्या लक्षात नक्की येईल की या योजनेसाठी नेमका पाठपुरावा कोणी केला आहे.’’