
‘ज्युबिलंट स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात
गुळुंचे ता.२६ : ज्युबिलंट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ मुलांच्या हस्ते मशाल पेटवून झाला.
यावेळी नवनीततर्फे घेतलेल्या चित्रकला स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देवून सत्कार करण्यात आला.
क्रीडा शिक्षिका सोनम निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध साधने वापरून गाण्यांवर व्यायाम प्रकार केले. यात विद्यार्थ्यांनी लेझीमवर नृत्य सादर केले. तसेच घुंगुर काठी, डंबेल, रिंग, झुरमुळे, अशा विविध साधनांचा वापर करून क्रीडा महोत्सवात रंगत आणली. तसेच ‘मेरी ख्रिसमस’ गाण्यावर नृत्य करत विद्यार्थ्यांनी ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. मुलांच्या शारीरिक विकासाच्या दृष्टीने आवश्यक खेळ घेण्यात आले. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार, पळणे, लिंबू-चमचा, वस्तु गोळा करणे, पोत्यातून पाय घालून पळणे, लांब उडी, उंच उडी, थाळी फेक, असे विविध मैदानी खेळ घेतले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज बनवून सहभाग घेतला. दरम्यान, शिक्षक पालक संघातील उपस्थित पालकांचा सन्मान करण्यात आला. विजया गवळी, सोनम निगडे, अंजली गारुळे तसेच इतर शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका रूपाली जाधव, वरिष्ठ शिक्षिका विजया गवळी, सायली फुंडे व सर्व पालकवर्ग, सहकारी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. अंजली गारुळे यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता गोळे, मीना खलाटे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.