नीरा येथे पारंपारिक पद्धतीने शिवजयंतीनिमित्त उपक्रम

नीरा येथे पारंपारिक पद्धतीने शिवजयंतीनिमित्त उपक्रम

गुळुंचे, ता. २८ : नीरा (ता. पुरंदर) येथे अखिल शिवजयंती उत्सव समिती निरा-शिवतक्रार यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. भव्य पारंपरिक मिरवणुकीने या तीन दिवसीय शिवजयंती कार्यक्रमाची सांगता झाली.

या तीन दिवसीय शिवजयंती कार्यक्रमात वकृत्व स्पर्धा, पोवाडे स्पर्धा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गाण्यावरती नृत्य स्पर्धा यांचा समावेश होता. दुसरे दिवशी प्रभाग क्रमांक ४ मध्ये पतीच्या निधनानंतर मुलांना कर्तृत्ववान बनविणाऱ्या आदर्श मतांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून त्यांचा सन्मान केला. तसेच येथील घुले मैदानावर शिवज्योत पूजन व शिवपूजन करण्यात आले. या शिवजनमोत्सवाची सांगता पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढून केली.

यावेळी आकर्षक ढोल पथक, गाठी मलखांब, हलगी, वादक, तसेच मावळे व घोड्यावरती लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा साकारली होती. ठिकठिकाणी भगवे झेंडे लावले होते. नीरा व पंचक्रोशीतील असंख्य शिवप्रेमी सोहळा पाहण्यासाठी आले होते. या सोहळ्याचे नियोजन अखिल शिवजयंती उत्सव समिती नीरा शिवतक्रार यांच्यावतीने केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com