
नीरा येथे तळवलकर, देशपांडे यांचा गौरव
गुळूंचे, ता. २ : नीरा (ता.पुरंदर) येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी डॉ.मनोती अभय तळवलकर यांना शारदा पुरस्काराने तर औषधशास्त्रातील पदवी प्राप्त केल्याबद्दल अमोल वसंत देशपांडे यांना परशुराम पुरस्काराने सन्मानित करून स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ गौरविण्यात आले.
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक यांच्या नीरा शाखेच्या वतीने ग्रामपंचायतीच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी डॉ.नारायण मधुकर राजूरवार यांनी सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्याविषयी उपस्थितांना माहिती दिली. केंद्राच्या वतीने भगवान परशुराम यांच्या जयंतीचे औचित्य साधून पहिली ते पाचवीच्या शालेय विद्यार्थ्यांच्या रामरक्षा, मनाचे श्लोक व आरत्या पाठांतर स्पर्धा घेण्यात येणार असून यशस्वी विद्यार्थ्यांना पुरस्काराने गौरवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रप्रमुख दत्तात्रेय बडबडे यांनी दिली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सोमेश्वरनगर येथील मु.सा.काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.देविदास वायदंडे लाभले. केंद्रप्रमुख दत्तात्रेय बडबडे यांनी प्रास्ताविक केले. निखिल बेलसरे यांनी सूत्रसंचालन तर आभार प्रसाद कामतकर यांनी मानले.
...........................................
28111