नीरा येथील मंदिरात बीज सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नीरा येथील मंदिरात बीज सोहळा
नीरा येथील मंदिरात बीज सोहळा

नीरा येथील मंदिरात बीज सोहळा

sakal_logo
By

गुळुंचे, ता. ११ : नीरा (ता. पुरंदर) येथे संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठगमन सोहळ्याचे आयोजन केले होते. येथील विठ्ठल मंदिरात श्री ज्ञानेश्वरी पारायण समितीच्या वतीने तुकाराम बीज साजरी करण्यात आली. यावेळी येथील सुभाष महाराज जाधव यांचे तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमन प्रसंगावरील कीर्तन झाले. कीर्तनानंतर भाविकांनी पुष्प वर्षाव करत तुकाराम बीज सोहळा साजरा केला. या सोहळ्यासाठी ज्ञानेश्वरी पारायण समितीचे अध्यक्ष प्रभुदयाल अग्रवाल, मार्गदर्शक लक्ष्मण चव्हाण, कार्याध्यक्ष चंद्रकांत धायगुडे, उपाध्यक्ष अशोक पोकळे, विश्वस्त सुभाष पवार, उत्तम घुले, विलास धायगुडे, मदन चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.