Sun, May 28, 2023

एसटीच्या निर्णयाचे
नीरा येथे स्वागत
एसटीच्या निर्णयाचे नीरा येथे स्वागत
Published on : 18 March 2023, 3:05 am
गुळुंचे, ता. १८ : महिलांना एसटी प्रवासासाठी ५० टक्के सवलतीबाबतचा निर्णय लागू केल्याबद्दल नीरा (ता. पुरंदर) येथे महिलांनी पेढे भरवून स्वागत करत आनंद व्यक्त केला. तसेच या निर्णयाबाबत शिंदे सरकारचे आभार मानले. नीरा येथे एसटी स्थानकावर प्रवासी महिलांनी एकमेकींना पेढे भरवत आनंद व्यक्त केला आहे. यावेळी भाजपच्या शहर अध्यक्षe नीलम कुदळे, कार्यकर्त्या राधा माने, कल्पना पटेल, रेखा पटेल, पद्मा शिर्के, प्रवीण पटेल, योगेंद्र माने आदी उपस्थित होते.