नीरेत ज्युबिलंट कंपनीत पुन्हा एकदा वायुगळती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नीरेत ज्युबिलंट कंपनीत पुन्हा एकदा वायुगळती
नीरेत ज्युबिलंट कंपनीत पुन्हा एकदा वायुगळती

नीरेत ज्युबिलंट कंपनीत पुन्हा एकदा वायुगळती

sakal_logo
By

गुळुंचे, ता.२ : नीरा (ता.पुरंदर) व निंबूत (ता. बारामती) या दोन तालुक्यांच्या सीमावर्ती भागात कार्यरत असलेल्या ज्युबिलंट इनग्रेव्हिया कंपनीच्या एका प्लांटमध्ये वायुगळती झाली. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ॲसिड वाहून नेणाऱ्या पाइपच्या जोडामध्ये असलेले रबर उन्हाळ्यामुळे खराब झाले होते. त्यामधून ॲसिडची गळती झाली.
वायुगळती होताच कंपनी प्रशासनाने वेळीच हालचाल केली. वायुगळती रोखण्यात यश मिळविले. मात्र, वारंवार होणाऱ्या या घटनांनी नीरा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, घटनेबाबत कंपनीचे जनसंपर्क अधिकारी इसाक मुजावर यांनी सांगितले की, देखभाल दुरुस्ती दरम्यान ऍसिडची गळती होत असल्याचे निदर्शनास आल्याने तत्काळ सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. त्यामुळे कोणतीही दुर्घटना झाली नाही. वायुगळती काही क्षणापुर्तीच झाली होती.