नीरा येथे ध्वजवंदन

नीरा येथे ध्वजवंदन

गुळुंचे, ता. ४ ः नीरा (ता. पुरंदर) येथे भगवान महावीर यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. यावेळी मंदिरामध्ये प्रद्युम्नकुमार दोशी यांच्या हस्ते ध्वजवंदन करून भगवान महावीरांच्या प्रतिमेची पालखीतून सवाद्य मिरवणूक काढून ग्रामप्रदक्षिणा घालण्यात आली.
ग्रामप्रदक्षिणेवेळी ''जगा आणि जगू द्या, ''शुद्ध आहार शाकाहार '', ''महावीरांचा जयजयकार'' असा जयघोष करण्यात आला. ''अहिंसा परमो धर्म'' ची शिकवण देणाऱ्या भगवान महावीरांच्या फुलांनी सजवलेल्या पालखीमागे जोडीने कुंभ घेऊन फिरण्याचा मान यश व्होरा व संयमी व्होरा या नवदांपत्याला मिळाला. तर रथामध्ये बसण्याचा मान विपुल जैन व निकिता जैन या दांपत्याला मिळाला.
ग्रामप्रदक्षिनेनंतर मिरवणूक मंदिरात आल्यानंतर सर्व श्राविकांनी नृत्य केले. विशाल दोशी यांच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी चढावे होऊन पंचामृत अभिषेक व नामकरण सोहळा पार पडला. सांस्कृतिक कार्यक्रम, भजन व आरतीने जन्मकल्याण महोत्सवाची सांगता करण्यात आली.
दरम्यान, ग्रामप्रदक्षिणेवेळी उपसरपंच राजेश काकडे, दीपक काकडे, उत्तम अगवणे, दत्ताजी चव्हाण, विजय धायगुडे, अनिल चव्हाण, ऋषी धायगुडे यांनी पालखीचे स्वागत करत प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
यावेळी सुरेश शहा, मनोज शहा, पद्मराज कोठाडिया, शैला शहा, रेणुका कोठाडिया, राजेंद्र जैन या सर्व विश्वस्तांसह मोठ्या संख्येने जैन बांधव उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com