ट्रक चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला अपघात

ट्रक चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला अपघात

गुळुंचे, ता.२८ : नीरा(ता.पुरंदर) येथील नीरा नदीच्या पुलावर आज (ता. २८) अपघात होता होता वाचला. भरधाव वेगातील ट्रकला अचानक दुचाकीने कट मारला आणि ट्रक रस्त्याचा कठडा तोडून रेलिंगच्या दिशेने गेला. मात्र, चालकाने वेळीच प्रसंगावधान राखल्याने ट्रक जागेवर थांबला. हा ट्रक थांबला नसता तर पुलाचे रेलिंग तोडून तो थेट नदीपात्रात कोसळला असता.
पुणे - पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा नदीच्या पुलावरून लोणंद (जि. सातारा) बाजूकडून मालवाहतूक करणारा ट्रक नीरेकडे चालला होता. अचानक महिला दुचाकीस्वाराने कट मारल्याने ट्रकचालकाने स्टिअरिंग डाव्या बाजूला ओढले. या दरम्यान ट्रकचे पुढील बाजूचे डावे चाक रस्त्याचे पादचारी मार्गाच्या कठड्यावरून फुटपाथवर गेले. ट्रकचे डावी बाजू पुलाच्या संरक्षक कठड्याला धडकली असती तोच चालकाने ब्रेक मारल्याने अनर्थ टळला. अन्यथा ट्रक नदीत कोसळून अपघात झाला असता.
दरम्यान, नीरा व परिसरातील युवकांनी शर्थीचे प्रयत्न करत कठड्यावरून ट्रक पुन्हा रस्त्यावर आणला. यादरम्यान, पुणे - पंढरपूर रोड, नगर - सातारा रोडवर सुमारे दीडतास वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिक युवकांनी वाहतूक कोंडीतून वाहनचालकांना वाट काढून दिली.

01407

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com