
गुळुंचे, ता. २० : सहकार भारती पुणे विभागाचा निवासी अभ्यासवर्ग नुकताच आळंदी येथे पार पडला. यावेळी सहकार भारती पुणे जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. सहकार भारतीच्या पुणे जिल्ह्याच्या संघटन प्रमुखपदी नीरा (ता. पुरंदर) येथील नितीन कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. याच कार्यक्रमात प्रदेश महामंत्री विवेकजी जुगादे यांनी ‘सहकार भारती काल, आज व उद्या’ या विषयावर सत्र घेतले. याप्रसंगी सहकार भारतीचे पुणे विभाग प्रमुख गिरीश भवाळकर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष तथा भारती सहकारी बँकेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब कड, बी. बी. कड, विनय खटावकर, मकरंद ढवळे, दिनेश गांधी, दशरथ जाधव आदी उपस्थित होते. दिनेश गांधी यांनी प्रस्तावना केली. दशरथ जाधव यांनी आभार मानले.
01984