वाघापुरात रंगल्या १६० मल्लांच्या कुस्त्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाघापुरात रंगल्या १६० मल्लांच्या कुस्त्या
वाघापुरात रंगल्या १६० मल्लांच्या कुस्त्या

वाघापुरात रंगल्या १६० मल्लांच्या कुस्त्या

sakal_logo
By

गराडे, ता. २८ : वाघापूर (ता. पुरंदर) येथील श्री भैरवनाथ चैत्री उत्सवानिमित्त जंगी कुस्ती आखाड्याचे आयोजन केले होते. आखाड्यातील शेवटची रंगलेली पुरंदर केसरी प्रतीक जगताप व रघुनाथ जगताप यांच्यामधील कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. आखाड्यात विविध तालुक्यातून सुमारे १६० मल्लांनी निकाली डाव टाकत कुस्तीशौकीनांच्या डोळ्याचे पारणे फेडले.

ही कुस्ती विशाल पुरंदर पतसंस्थेचे अध्यक्ष व गावचे उपसरपंच सौरभ कुंजीर, माजी सरपंच बाजीराव कुंजीर, ॲड. नितीन कुंजीर व ॲड. सुनील कुंजीर, अरुण कुंजीर यांचे हस्ते लावण्यात आली. या वेळी सरपंच रेवती कुंजीर, विजय कुंजीर, विकास इंदलकर, भिवाजी कुंजीर, संदीप कुंजीर, नवनाथ कुंजीर, नवनाथ इंदलकर, संतोष कुंजीर, सुरेश कुंजीर, रवींद्र कुंजीर, सागर कुंजीर बाळासाहेब कुंजीर, चांगदेव कुंजीर, शंकर कड, प्रवीण कड, सुखदेव कुंजीर, अशोक कुंजीर, गोरख कुंजीर, रामदास कुंजीर, बाळासाहेब सि. कुंजीर, संजय कुंजीर, नामदेव कुंजीर, सुनील कुंजीर, सोमनाथ शेंडकर, नंदकुमार कुंजीर, उत्तम पवार, विजय द. कुंजीर आदी उपस्थित होते.

अतुल इंदलकर व पैलवान अक्षय वाघमारे या स्थानिक मल्लांची कुस्ती होऊन मिळालेले इनाम त्यांनी वाघापुरच्या मंदिराच्या कामासाठी दिले.
कुस्ती आखाड्याचे निवेदन दत्तात्रेय कुंजीर, विकास इंदलकर व चांगदेव कुंजीर यांनी केले. आभार ॲड. नितीन कुंजीर यांनी मानले.
श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांना पहाटे पंचामृतांचा अभिषेक घालण्यात आला. सायंकाळी फुलांनी सजविलेल्या पालखीची व कावडीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी २५ छबिण्याच्या पथकांनी सहभाग घेतल्याची माहिती मंदिराचे पुजारी दादा गाडेकर यांनी दिली.

कुस्ती आखाड्यानंतर लोककलावंत भाऊ मोडक यांच्या लावण्यांच्या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठी दाद दिली. त्यानंतर यात्रेची सांगता झाल्याची माहिती पुणे जिल्हा पोलिस पाटील संघटनेचे कार्याध्यक्ष विजय कुंजीर यांनी दिली.

04972

Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b02768 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top