कलिंगडामुळे उन्हाळ्यात लाभला नफ्याचा गारवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कलिंगडामुळे उन्हाळ्यात लाभला नफ्याचा गारवा
कलिंगडामुळे उन्हाळ्यात लाभला नफ्याचा गारवा

कलिंगडामुळे उन्हाळ्यात लाभला नफ्याचा गारवा

sakal_logo
By

सासवड शहर, ता.५ : बाजारपेठेत सर्वाधिक मागणी असलेल्या पिकाची लागवड करून गोटीमाळ (ता. पुरंदर) येथील सुभेदार शेती फार्मचे विष्णुदास व चंद्रकांत पंढरीनाथ कामथे या बंधूंनी कलिंगडाची शेती फुलविली. ठिबक सिंचनद्वारे पाण्याचे सिंचन करून केवळ दीड एकरामध्ये पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळविण्यात यश मिळविले. मेलोडी जातीच्या कलिंगडामुळे आर्थिक वृद्धी होणार असल्याने कडक उन्हाळ्यात गारवा मिळल्याची भावना कामथे कुटुंबाकडून व्यक्त होत आहे.

सुभेदार शेती फार्ममधील पंधरा वर्षांची डाळिंबाची बाग होती. ती काढून कामथे यांनी कलिंगडाचे पीक घेण्याचा निर्णय घेतला. मल्चिंगद्वारे मेलोडीची लागवड केली. तीन महिने पाणी पुरविण्यासाठी ठिबक सिंचनाचा पुरेपूर वापर करून घेतला. आवश्यक खात्यांच्या वापर केल्यामुळे कलिंगडाचे पिंक चांगलेच बहरले. सध्या त्याद्वारे दररोज ४०० ते ६०० कॅरेटचा माल मिळत आहे.

आत्मविश्‍वासाने केली लागवड
१. योग्य जमिनीची उत्तम नांगरट, मशागत
२. दोन टॅक्टर कोंबडी खत व शेणखत
३. गरजेनुसार सुफला पाच पिशव्यांचा वापर
४. मल्चिंग पेपरचा जमिनीवर अंथरले
५. सात फेब्रुवारीला मेलोडी जातीचे बियाणे लावले.
६. वीस हजार रुपयांचे ठिकक सिंचन अंथरले.


थेट बांधावरूनच मालाची विक्री
पिकाला सुरुवातीला पाणी थोडं कमी लागते. परंतु नंतर चार दिवसाला पाणी दिले. प्लॉट हार्वेस्टिंगला येण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी गेला. त्याच्यानंतर बांधावरून कलिंगडाची
विक्री सुरू झाली. त्या बारा रुपये किलोने भाव मिळाला. तालुक्यात सद्या ४० अंशाच्या पुढे तपमान गेल्याने कलींगडाला मागणीही वाढली, असे विष्णुदास कामठे व चंद्रकांत कामथे यांनी सांगितले.


दीड एकर क्षेत्रातध्ये चाळीस-पंचेचाळीस टन कलिंगड मिळेल. यात १२ रुपये किलो जागेवर दर मिळत आहे. पाच लाखापर्यंत उत्पन्न निघेल. त्यात ५० हजार रुपये खर्च वजा जाता निव्वळ नफा अधिक साधारण साडेचार लाख रुपये मिळण्याची आशा आहे.
-चंद्रकांत कामथे

मेलोडी वाणाच्या कलिंगडाला वेळात फवारणी केली तर तसा रोगाचा प्रार्दुभाव कमी रहातो. पाण्याची शाश्वत जर सोय असेल तर शेतकऱ्यांनी याकडे वळायला काही हरकत नाही.
- विलास जगताप, शेती उद्योग

मेलोडी वाणाची वैशिष्ट्ये
* एक समान आकाराची फळे.
* सरासरी पाच ते सात किलो वजन
* गोड गर्द लाल रंगाची फळे
* वजन कमी असल्याने हाताळण्यास सोपी

04982

Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b02773 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top