सासवडला शांती- सलोखा अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सासवडला शांती- सलोखा अभियान
सासवडला शांती- सलोखा अभियान

सासवडला शांती- सलोखा अभियान

sakal_logo
By

सासवड शहर, ता. २ ः द्वेष आणि दुहीचे विषारी राजकारण अमान्य करत शांतता, मैत्री, प्रेम यांवर आधारित स्नेहपूर्ण सहजीवनाच्या निर्धारासह सासवड येथे विवेकी युवा मंच आणि संविधान परिवाराच्या कार्यकर्त्यांनी अस्वस्थता व्यक्त केली.
सासवड (ता. पुरंदर) येथे शांती- सलोखा अभियानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हातात पांढरे कापड फलक घेऊन, शांतपणे उभे राहून नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत लक्ष्मी शंकर, दत्तात्रेय कड, आतिश जगताप, अनिकेत भगत, योगेश धेंडे, अभिजित कुंभारकर, सायली कामथे, तृप्ती कामथे, श्रुती प्रभुणे, समृद्धी इभाड, ऋणानुबंध संस्थेचे देवानंद भालेराव, राष्ट्र सेवा दलाचे संदीप सोलापूरकर, कावेरी कुंभारकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b02780 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top