कोडित येथील शिबिरात २५० जणांची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोडित येथील शिबिरात २५० जणांची तपासणी
कोडित येथील शिबिरात २५० जणांची तपासणी

कोडित येथील शिबिरात २५० जणांची तपासणी

sakal_logo
By

गराडे, ता. ३ : कोडित (ता. पुरंदर) येथे श्री देवनाथ म्हसोबा महाराज ट्रस्ट व मॅग्नम हेल्थ केअर सोल्यूशन पुणे यांच्यावतीने मोफत हृदयरोग निदान व उपचार शिबिर घेण्यात आले. यात २५० जणांची केली तपासणी करण्यात आली.

यामध्ये तज्ज्ञांनी हृदयरोगासंबंधी माहिती, शस्त्रक्रियेनंतर घ्यावयाची दक्षता तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी मदत मिळविण्यासंदर्भात विनामूल्य मार्गदर्शन या वेळी केले. यामध्ये हृदयरोग व त्याच्याशी संबंधित सर्व शस्त्रक्रिया, अँजिओप्लास्टी, स्प्रिंग, स्टेनसहित बायपास सर्जरी, हृदयाचा व्हॉल्व्ह बदलणे यासारख्या महत्त्वाच्या शस्त्रक्रियांचा समावेश होता. या शस्त्रक्रियांसाठी खासगी रुग्णालयात साधारणपणे दोन ते चार लाखांपर्यंत खर्च येतो. त्या मोफत करण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब बडदे यांनी सांगितले.

या वेळी ट्रस्टचे विश्वस्त बाळासाहेब य. बडदे, ईश्वर बडदे, श्रीनाथ ग्रामसंघाच्या अध्यक्षा अलका बडदे, सुनीता बडदे, आदिमाया बडदे, सुजाता बडदे, चंद्रभागा बडदे, सुलोचना बडदे, मुक्ताबाई बडदे, सारिका बडदे, उमेश बडदे आदी उपस्थित होते.

कोडित (ता. पुरंदर) : आरोग्य तपासणीप्रसंगी उपस्थित मान्यवर.

Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b02785 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top