
गराड्याने जपली ऐक्याची परंपरा
गराडे, ता. ३ ः पूर्वीपासून गराड्यात हल्या-डुल्या, ताबूत, नवरात्र उत्सव हे सण एकत्र साजरे करण्याची परंपरा आहे. मुस्लिमांच्या मिरवणुकीत हिंदू ढोल बांधून पुढे तर हिंदूंच्या मिरवणुकीत मुस्लिम ढोल बांधून पुढे चालत असत. ही परंपरा आजही कायम असल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाराम जगदाळे यांनी सांगितले.
गराडे (ता. पुरंदर) येथील नूर मस्जिद येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने रमजान ईद निमित्त सामूहिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी गराडे व परिसरातील मुस्लिम बांधव उपस्थित होते. यावेळी गंगाराम जगदाळे यांच्या हस्ते दर्ग्यात पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानंतर सामूहिक शिरखुरमा वाटप करीत हिंदू - मुस्लीम बांधवांच्या भेटीचा कार्यक्रम झाला.
यावेळी सरपंच नवनाथ गायकवाड, उपसरपंच समीर तरवडे, तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष योगेश जगदाळे, संजय रावडे, रोहित खवले, मोहन घाटे, दादा रावडे, पोलिस पाटील सुरेश जगदाळे, शिवाजी जगदाळे आदी उपस्थित होते. रफिक शेख, मोहसीन शेख, समीर शेख, जाकीर शेख, दस्तगीर मुलाणी, फिरोज मुलाणी, जमीर शेख, अल्ताफ आतार, जावेद आतार, मोहम्मद तांबोळी, अश्पाक शेख, अझरुद्दीन शेख, अस्लम शेख, बशीर शेख, दिलीप मुलाणी, नासिर शेख, शौकत आतार आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले. मोहन जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले. मुन्नाभाई शेख यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b02786 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..