
सासवडच्या ईदगाह मैदानावर नमाज पठण
सासवड शहर, ता. ५ ः सासवड येथील चारशे वर्षांची परंपरा असणाऱ्या ईदगाह मैदानावर नमाज पठण करून मुस्लीम बांधवांनी रमजान ईद साजरी केली. पुरंदरचे आमदार संजय जगताप, माजी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, पोलिस उपनिरीक्षक विनय झिंजूरके, पालिका आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
मौलाना शमशाद आलम शेख यांनी यावेळी नमाज पठण करून समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी दुवा मागितली. रोजा उपवास करणाऱ्या अरविंद चिव्हे, मुस्लीम समाजासाठी सेवा करणाऱ्या अनंता रणपिसे, बादशाही मस्जिदचे शाकीर काझी यांचा यावेळी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हाजी शकील बागवान, नुरमोहमद अत्तार, हाजी गुलाब अत्तार, पापाभाई बागवान, इलाही बागवान, दिलावर बागवान, खाजाभाई बागवान, शकील बागवान, रमजान अत्तार, जुबेद काझी यांसह मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव यावेळी हजर होते. दरम्यान दर्गाह मस्जिद मध्ये देखील मौलाना इकबाल यांनी खुदबा व नमाज पठण करून हिंदू मुस्लीम ऐक्यासाठी दुवा मागितली. हाजी हसनभाई तांबोळी, अकबरभाई इनामदार, आरिफ अत्तार, अश्पाक तांबोळी, मोमीन बागवान, हारून बागवान यांसह अनेक मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमानंतर अनेक मुस्लिम बांधवांनी कब्रस्तान येथे जाऊन दिवंगत बांधवांना अभिवादन केले. ॲड अश्पाक बागवान यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b02788 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..