शरद पवार उद्या पुरंदर किल्ल्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शरद पवार उद्या पुरंदर किल्ल्यावर
शरद पवार उद्या पुरंदर किल्ल्यावर

शरद पवार उद्या पुरंदर किल्ल्यावर

sakal_logo
By

पुरंदर किल्ल्यावर शनिवारी
संभाजी महाराज जयंती सोहळा
सासवड शहर, ता. १० : छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यानिमित्त शनिवारी (ता. १४) किल्ले पुरंदरवर पाळणा, छबिना, पालखी सोहळा, मर्दानी खेळ, चित्तथरारक कसरती, शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, नाणी प्रदर्शन, व्याख्यान, पोवाडा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच, विविध पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिली.

शरद पवार उद्या किल्ल्यावर
गायकवाड यांनी सांगितले की, संभाजी ब्रिगेडच्या वतीने दरवर्षी किल्ले पुरंदरला छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा केला जातो. किल्ले पुरंदर येथे लष्कराच्या वतीने सभागृह बांधण्यात आले असून, छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी केली आहे. लष्कराच्या वतीने गडावर अनेक कामे केली आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर किल्ले पुरंदरचा पाहणी दौरा आणि संभाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे गुरुवारी (ता. १२) सकाळी १० वाजता किल्ले पुरंदरवर येणार आहेत.

श्रीराम पवार, इंद्रजित सावंत,
निखिल चव्हाण यांना पुरस्कार
‘सकाळ’चे संपादक संचालक श्रीराम पवार, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, सिनेअभिनेता निखिल चव्हाण यांना ‘छत्रपती संभाजी महाराज गौरव’ पुरस्कार जाहीर केला असून, श्री मार्तंड देवस्थान देव संस्थान, अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा जॉब्स अँड्रॉइड टीम, युवा उद्योजक रामदास गवते, प्रगतशील शेतकरी नवनाथ धोत्रे, श्री मार्तंड देव संस्थान विश्वस्त संदीप जगताप, कॉलर लंडन स्कूल ऑफ राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते प्रवीण निकम यांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सागर जगताप यांनी दिली.

Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b02796 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top