चांबळी येथे मारहाणीत एकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चांबळी येथे मारहाणीत एकाचा मृत्यू
चांबळी येथे मारहाणीत एकाचा मृत्यू

चांबळी येथे मारहाणीत एकाचा मृत्यू

sakal_logo
By

सासवड शहर, ता. १० : चांबळी (ता. पुरंदर) येथे मारहाणीत एकाचा जागीच मृत्यू झाला. त्याचे नाव राजेश ताठीले, असे आहे.
याबाबत सासवड पोलिसांनी माहिती दिली की, शनिवारी (ता. ७) रात्री ८ वाजण्यापूर्वी चांबळी येथे जिल्हा बॅंकेच्या शाखेसमोर आरोपी सचिन ऊर्फ कपिल सुदाम कामठे (वय २७), गणेश नवनाथ कामठे (वय २४, दोघेही रा. चांबळी) यांनी राजेश ताठीले यास कोणत्या तरी कारणाने मारहाण केली. त्यानंतर सोमनाथ अंकुश जगदाळे (वय २२, रा. गराडे, ता. पुरंदर) यांनी त्यास सुरवातीस चांबळीतील डॉक्टरांकडे नेले. त्यांनी त्यास सासवडला घेऊन जाण्यास सांगितले. मात्र, सासवड येथील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याबाबत सोमनाथ यांनी फिर्याद दिली. त्यानुसार सासवड पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. न्यायालयाने आरोपींना १७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b02797 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top