‘पुरंदर प्रतिष्ठान’च्या पुरस्कारांचे आज वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पुरंदर प्रतिष्ठान’च्या पुरस्कारांचे आज वितरण
‘पुरंदर प्रतिष्ठान’च्या पुरस्कारांचे आज वितरण

‘पुरंदर प्रतिष्ठान’च्या पुरस्कारांचे आज वितरण

sakal_logo
By

गराडे, ता. १२ : ‘पुरंदर प्रतिष्ठान’च्या वतीने शनिवारी (ता. १४) पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. या निमित्ताने सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, व्यावसायिक तसेच विविध क्षेत्रातील नावीन्यपूर्ण व चमकदार कामगिरी करणाऱ्या संस्था व व्यक्तींना ‘छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती पुरंदर प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष प्रशांत पाटणे व उत्सव प्रमुख प्रदीप बोरकर यांनी दिली.
छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार पुढीलप्रमाणे : सर्वोत्कृष्ट संस्था- ग्रामीण संस्था पुरंदर-हवेली (अध्यक्षा, राजवर्धिनी संजय जगताप), कोविड-१९ मध्ये समाजासाठी विशेष कामगिरी करणाऱ्या संस्था- सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्ट धनकवडी (पुणे), पारनेरचे आमदार नीलेश लंके, पुण्याचे माजी नगरसेवक वसंत मोरे.
छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार विजेते : पुरंदररत्न पुरस्कार- पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, उद्योग प्रेरणा पुरस्कार- एस फॅमिली, उत्कृष्ट प्रशासकीय सेवारत्न- अतिरिक्त पोलिस अधिकारी रायगड अतुल झेंडे, उत्कृष्ट खिलार संवर्धन पुरस्कार- उद्यान पंडित शशिकांत शंकर पुदे, समाजरत्न पुरस्कार- राष्ट्रशक्ती संघटना (अध्यक्ष, माउली दारवटकर), कृषिरत्न पुरस्कार- प्रगतशील शेतकरी- समीर उत्तम काळे, उद्योगरत्न पुरस्कार- महेश रवींद्र कामथे, सामाजिक कार्यकर्ता रत्न पुरस्कार- मातोश्री सामाजिक महिला विकास संस्था (अश्विनी नागेश वाघ), पर्यावरण रक्षण पुरस्कार- जय मल्हार फाउंडेशन जेजुरी, शाहीररत्न पुरस्कार- शाहीर सुरेश धुमाळ, कलारत्न पुरस्कार- मॉर्डन कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स पुणे, सोशल मीडिया पुरस्कार- खिल्लार महाराष्ट्राची शान (सूरज सुधाकर दिघे), कृषिरत्न पुरस्कार- पुरंदर हायलँड्स फार्मस प्रोडूसर कंपनी लिमिटेड पुरंदर, गडकिल्ले संवर्धन पुरस्कार- सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र, पर्यावरण रत्न पुरस्कार- पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. सचिन अनिल पुणेकर, विशेष कार्य गौरव पुरस्कार- मास्टर माईंड योगेश धुमाळ आणि अखिल भारतीय मराठा महासंघ महिला अध्यक्ष पुरंदर राधिका अशोक कटके.
पुरंदर प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले पुरंदरवर महाराष्ट्रातून शंभू ज्योत घेऊन येणाऱ्या शंभूभक्तांना १३ मे रोजी रात्रभर व १४ मे रोजी दिवसभर महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b02802 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top