पिंपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नितीन शेंडकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी ग्रामपंचायतीच्या 
सरपंचपदी नितीन शेंडकर
पिंपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नितीन शेंडकर

पिंपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नितीन शेंडकर

sakal_logo
By

गराडे, ता. ११ ः पिंपरी (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या नितीन शंकर शेंडकर यांची तर उपसरपंचपदी योगिता दत्तात्रेय थेऊरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी लाखे यांनी जाहीर केले.
सरपंच व उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एक-एक अर्ज आल्याने दोन्ही निवडी बिनविरोध घोषित करण्यात आल्या. मावळते सरपंच दिलीप शेंडकर आणि उपसरपंच मोहिनी हंबीर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी ही निवडणूक पार पडली.
या प्रसंगी सदस्या कविता संजय शेंडकर, मनस्वी शेंडकर, अनिता शेंडकर, सदस्य हरीश शेंडकर, काळूराम हंबीर, सदाशिव साळुंके आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, गंगाराम जगदाळे, संजय कामठे, सुनील धिवार, माणिक निंबाळकर, सोनाली घाडगे, हेमलता खेडेकर, छाया नानगुडे, अशोक दळवी, रवींद्र ताकवले, निवृत्ती जरांडे आदींनी सरपंच व उपसरपंच यांचे अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b02803 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top