भजनी मंडळांना साहित्य वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भजनी मंडळांना साहित्य वाटप
भजनी मंडळांना साहित्य वाटप

भजनी मंडळांना साहित्य वाटप

sakal_logo
By

सासवड शहर, ता. ११ : सासवड (ता. पुरंदर) येथील पुरंदर पंचायत समितीच्या कार्यालयात तालुक्यातील खानवडी, धालेवाडी व रानमळा या तीन गावांतील भजनी मंडळांना पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने साहित्य वाटप करण्यात आले. श्रीराम भजनी मंडळ, खानवडी, माऊली भजनी मंडळ, धालेवाडी, संत सावतामाळी भजनी मंडळ, रानमळा यांना हार्मोनिअम, मृदुंग, वीणा आणि दहा जोड टाळ असे साहित्य जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाराम जगदाळे व पुणे श्रमिक पत्रकार संघाचे प्रकाश भोईटे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी पी. एस. मेमाणे, सासवड बारचे माजी अध्यक्ष ॲड. शिवाजी कोलते, भाजपचे युवानेते जालिंदर जगताप, धालेवाडी सोसायटी चेअरमन हनुमंत काळाणे, रानमळ्याचे सरपंच विशाल कुदळे, खानवडीचे उपसरपंच स्वप्नील होले, एकनाथ काळाणे, यमाजी होले, विठ्ठल होले, महादेव खोमणे, राहुल होले, दत्तात्रेय होले, कैलास काळाणे, मुकुंद कुदळे, बाळासाहेब काळाने, सुभाष काळाने, गोविंद भोसले, तुषार काकडे, प्रदीप भोसले, धनंजय कुदळे, सुनील वढणे, रवी कोलते आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b02805 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top