
‘पुरंदरचे विमानतळ झालेच पाहिजे’
गराडे : ‘‘आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरमध्ये झालेच पाहिजे. त्याच्यासाठी दोन जागा आहेत. जुन्या जागेला काही ना काही अडचणी येत आहेत. दुसऱ्या जागेला विरोध कमी होता. काही महिन्यापूर्वी केंद्र सरकारने दुसऱ्या जागेच्या संदर्भात प्रतिकूलता दाखवली होती. त्यातून मार्ग काढावा, यासाठी संरक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. राज्य सरकारच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत काही महिन्यापूर्वी मी दिल्लीमध्ये बैठक घेतली होती. हा प्रश्न मिटावा, असा आमचा प्रयत्न होता. नंतर या जागेला नकारार्थी निर्णय केंद्र सरकारने दिला. पुन्हा एकदा आम्ही प्रयत्न करणार आहोत,’’ अशी माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली.
पुरंदर किल्ल्याच्या पाहणीनंतर नारायण पेठ (ता. पुरंदर) येथे पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘लोहगावचे विमानतळ संरक्षण खात्याच्या ताब्यात आहे. तेथे मर्यादा आहेत. त्या विमानतळाचे विस्तारीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली. परंतु, त्यामुळे प्रश्न सुटणार नाही. पुणे व परिसर औद्योगिक क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पुरंदरमध्ये विमानतळ करावेच लागेल. पुरंदर विमानतळ पुरंदरपुरते मर्यादित नाही. तर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, नगर, खेड, जुन्नर, आंबेगावपासून सर्व परदेशात जाणाऱ्या लोकांना याचा फायदा होणार आहे. आम्ही राजकीय भूमिका बाजूला ठेवत पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्याशी देखील माझी चर्चा झालेली आहे.’’
Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b02809 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..