पुरंदर किल्ल्यावर विविध संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरंदर किल्ल्यावर विविध संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती
पुरंदर किल्ल्यावर विविध संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती

पुरंदर किल्ल्यावर विविध संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती

sakal_logo
By

स्मारकातून इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचणार
खासदार सुप्रिया सुळे यांचे मत; पुरंदरवर संभाजी महाराज जयंती सोहळा
गराडे, ता. १४ : ‘‘छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नातून व संकल्पनेतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ३०० कोटी रुपयांचा आराखडा बनवण्यात आला आहे. संभाजी महाराजांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचविण्यासाठी हे स्मारक उभे राहणार आहे. संभाजी महाराजांचा खरा इतिहास जनतेसमोर आला पाहिजे,’’ असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

किल्ले पुरंदरवरील सभागृहात शनिवारी (ता. १४) संभाजी महाराज जयंती सोहळा पंचायत समिती, संभाजी ब्रिगेड व पुरंदर प्रतिष्ठान यांच्या वतीने साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सकाळी पाळणा, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीची ढोल पथकासह मिरवणूक झाली. यावेळी मोठ्या प्रमाणावर तरुणांनी हजेरी लावली. तसेच, विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी छत्रपती युवराज शहाजीराजे भोसले, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार संजय जगताप व रोहित पवार, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, प्रा. दिगंबर दुर्गाडे, अशोक टेकवडे, गंगाराम जगदाळे यांच्या हस्ते संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संभाजीराव झेंडे, प्रशांत वांडेकर, गंगाराम जगदाळे, दत्ता झुरंगे, सुदाम इंगळे, ॲड. नितीन कुंजीर, बाळासाहेब भिंताडे, बापूसाहेब माहुरकर, राजेंद्र कोंढरे, दत्ता धनकवडे, वसंत मोरे, सुनील धिवार, धनंजय पाटील, प्रमोद गायकवाड, रूपाली सरनोबत, अमर माने, पी. एस. मेमाणे आदी उपस्थित होते.
विश्वजीत कदम म्हणाले, ‘‘पुरंदर प्रतिष्ठान व संभाजी ब्रिगेड या संस्था विचारांचा जागर करण्याचे काम करीत आहेत. महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचे विचार पोचविण्याचे काम देखील या सामाजिक संस्था करत असतात.’’ रोहित पवार म्हणाले, ‘‘गड-किल्ल्यांचे जतन झाले पाहिजे. इतिहास हा इतिहास असतो, इतिहास बदलता येत नाही. काही संघटना खोटा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. संभाजी महाराजांनी अनेक गोष्टी आत्मसात केल्या होत्या.’’ शिवतारे म्हणाले, ‘‘महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न केले. संभाजी महाराज अजून काही वर्ष जगले असते, तर या महाराष्ट्राचा इतिहास भूगोल बदलला असता.’’ आमदार जगताप म्हणाले, ‘‘पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला सोळा एकरामध्ये प्रवीण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शंभूसृष्टी लवकरच उभी करणार आहे.’’

तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे आचार, विचार व प्रेरणा आत्मसात करण्याची गरज आहे. त्यातून महाराष्ट्राची अस्मिता जतन करण्याचे काम होईल.
- छत्रपती युवराज शहाजीराजे भोसले

पवार, चव्हाण, सावंत यांचा सन्मान
यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने ‘सकाळ’चे संपादक संचालक श्रीराम पवार, लेखक इंद्रजित सावंत, सिनेअभिनेता निखिल चव्हाण यांना ‘छत्रपती संभाजी महाराज गौरव’ पुरस्कार, श्री मार्तंड देवस्थान देव संस्थान, अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा जॉब्स अँड्रॉइड टीम, युवा उद्योजक रामदास गवते, प्रगतशील शेतकरी नवनाथ धोत्रे, श्री मार्तंड देव संस्थान विश्वस्त संदीप जगताप, कॉलर लंडन स्कूल ऑफ राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते प्रवीण निकम यांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच, ‘पुरंदर प्रतिष्ठान’च्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यात कोरोना काळात समाजासाठी काम करणाऱ्या ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी संजय जगताप, पुण्याचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांचा विशेष पुरस्कार देण्यात आला. तसेच, प्रा. दिगंबर दुर्गाडे, अतुल झेंडे, माउली दारवटकर, महेश कामठे, जय मल्हार फाउंडेशन, मॉडन कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स, आयर्लंड फार्मसी प्रॉडक्ट, गड सह्याद्री प्रतिष्ठान, सचिन पुणेकर, एस. फॅमिली, शशिकांत पुदे, समीर काळे, अश्विनी वाघ, सुरेश धुमाळ, सुरज दिघे,
योगेश धुमाळ, राधिका कटके यांना सन्मानित केले.

किल्ले पुरंदर (ता. पुरंदर) : संभाजी ब्रिगेडच्या वतीने ‘सकाळ’चे संपादक संचालक श्रीराम पवार, लेखक इंद्रजित सावंत, सिनेअभिनेता निखिल चव्हाण यांना ‘छत्रपती संभाजी महाराज गौरव’ पुरस्कार प्रदान करताना छत्रपती युवराज शहाजीराजे भोसले, खासदार सुप्रिया सुळे, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार संजय जगताप व रोहित पवार, प्रवीण गायकवाड व मान्यवर.
PNE22S64297

Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b02814 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top