Mon, March 27, 2023

सासवड येथे सोमवारी भाजपचे आंदोलन
सासवड येथे सोमवारी भाजपचे आंदोलन
Published on : 19 May 2022, 1:02 am
सासवड शहर ः पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिळवणुकीबाबत भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोमवारी (ता. २३) सासवड येथे तहसील कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष गंगाराम जगदाळे यांनी ही माहिती दिली. विद्युत पारेषन कंपनीकडून बेकायदेशीरपणे टॉवर उभारणी केली जात आहे, तसेच पुरंदर उपसा जलसिंचन योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भाववाढ करून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात असल्याचे जगदाळे यांनी सांगितले. या आंदोलनाला आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, माजी आमदार विजय काळे, किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष जालिंदर कामठे, बाबाराजे जाधवराव आदी नेते उपस्थित राहणार आहेत.