जरबेराच्या फुलांनी फुलविले झेंडे बंधूंचे आयुष्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जरबेराच्या फुलांनी फुलविले झेंडे बंधूंचे आयुष्य
जरबेराच्या फुलांनी फुलविले झेंडे बंधूंचे आयुष्य

जरबेराच्या फुलांनी फुलविले झेंडे बंधूंचे आयुष्य

sakal_logo
By

सासवड शहर, ता. २ : लग्न, तसेच इतर समारंभाची शोभा वाढविण्यासाठी तसेच बुके तयार करण्यासाठी जरबेराच्या फुलांना राज्यभर मागणी आहे. पारंपरिक पीक घेण्याऐवजी फायदेशीर फुलशेतीतून अधिक उत्पन्न मिळविण्याच्या दूरदृष्टीतून दिवे (ता. पुरंदर) येथील तरुण शेतकरी सचिन आणि राहुल झेंडे या बंधूंनी जरबेराच्या फुलशेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. त्यांच्या पॉलिहासमधील जरबेराच्या फुलांना पुण्यासह हैदराबाद, बडोदा, अहमदाबाद आणि मुंबई येथून मोठी मागणी आहे.

योग्य नियोजन व प्रतिकूल परिस्थितीत केवळ २० गुंठ्यात चांगला बाजारभाव मिळाल्याने त्यांना वर्षाकाठी तब्बल २५ लाख रुपयांचा फायदा मिळाला आहे. त्यांचा फुलशेतीचा या प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी वस्तुपाठच ठरला आहे. दिवे येथील चिंचवले खांबाईमळा येथे झेंडे यांचे ३० गुंठ्यांमध्ये पॉलिहाऊस आहे. यात २० गुंठ्यात जरबेराची फुलशेती शेततळ्याच्या पाण्यावर झेंडे बंधूंनी फुलविली आहे.

दरम्यान, सचिन झेंडे यांना शेतीत त्यांची पत्नी, आई, भाऊ आणि वहिनी यांची मोलाची साथ मिळत असून त्यांच्या कुटुंबातील लहान मुले देखील पॅकिंग करण्यासाठी मदत करतात.

फुलशेती तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी
पुरंदर तालुका हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. यावर मात करण्यासाठी शेततळ्याचा प्रयोग पॉलीहाउसमधील शेतीला उपयुक्त ठरत आहे. झेंडे बंधूंनी प्रतिकूल परिस्थितीत फुलविलेली शेती परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. फूल शेती विकसित करण्यासाठी त्यांना शेतकरी शंकरनाना काळे, मोहन झेंडे, प्रमोद टिळेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

आम्ही २०१३ मध्ये दहा गुंठ्यात कार्नेशन या फुलाची लागवड करत होतो. मात्र नफा व काळाची पावले ओळखून बुके तयार करण्यासाठी खूप मागणी असणाऱ्या जरबेराची फुलशेतीची लागवड केली. यासाठी मांजरी येथून के. एफ. बायोटेकमधून रोपे मागवविली. एका रोपाची किमत ३५ रुपये होती. प्रथम दहा गुंठ्यांमध्ये सहा हजार रोपांची व नंतरची वीस गुंठे क्षेत्रावर जरबेराची लागवड केली.
- राहुल झेंडे, फूल उत्पादक

लाल, नारंगी, गुलाबी, पिवळ्या रंगांच्या आकर्षक दहा फुलांची एक जुडी ५० ते ६० रुपयांना विकली जात आहे. पॉलिहाऊसमध्ये सध्या साडेतीनशे ते चारशे जुड्या होतील एवढी फुले दिवसाआड फुलत आहेत. या फुलशेतीतून तीन वर्षे जरबेराचे उत्पन्न मिळणार आहे. या जरबेराच्या फुलांची आमचे आयुष्य फुलविले आहे.
- सचिन झेंडे, फूल उत्पादक

सेंद्रिय खतांच्या वापरामुळे बचत
रासायनिक खतांच्या भावामुळे शेती करणे जिकरीचे होऊन बसले आहे. त्याला पर्याय म्हणून जैविक सेंद्रिय खतांचा वापर केला जात आहे. त्यामुळे खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होत आहे, असे झेंडू बंधूंनी ''सकाळ''शी बोलताना सांगितले. जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता या दोन्ही बाबी पीक उत्पादन वाढीसाठी उपयुक्त आहेत जमिनीचे आरोग्य टिकून ठेवण्यासाठी माती परीक्षण करून पीक नियोजन करणे गरजेचे असते, असे सचिन झेंडे यांनी सांगितले.

05138, 05137

Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b02855 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top