ऋणानुबंधने स्वच्छ केला दिवे घाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऋणानुबंधने स्वच्छ केला दिवे घाट
ऋणानुबंधने स्वच्छ केला दिवे घाट

ऋणानुबंधने स्वच्छ केला दिवे घाट

sakal_logo
By

गराडे, ता. २९ : पुरंदर तालुक्यातील निसर्गरम्य असणारा दिवे घाट स्वच्छ करण्याचे काम ऋणानुबंध संस्था नेहमी करत असते. वारीनंतर दिवे घाटात रस्त्याच्या दुतर्फा असलेला कचरा युवक युवतींनी जमा करत दिवे घाटापासून ४ किलोमीटरचा परिसर स्वच्छ केला आहे. यामध्ये रस्त्यावर असलेला प्लास्टिक कचरा, कागद, पाण्याच्या बाटल्या, कागदी कप, अशा विघटन न होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली. सिरम इन्स्टिट्यूट क्लीन सिटी यांच्याकडून कचरा उचलण्यासाठी वाहन दिल्यामुळे कचरा योग्य जागी पोहोचवणे सोपे झाले.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडला येण्याअगोदर संस्थेतील सदस्यांनी सासवड शहरात कचरा टाकण्यासाठी कचरा बॅगची सोय केली होती. सासवड शहरात कचरा वाढू नये म्हणून हा प्रयत्न केला गेला होता. ऋणानुबंध संस्थेच्या या उपक्रमाला सिरम इन्स्टिट्यूट आदर पुनावाला, डॉ. संजय रावळ, राजकुमार पवार, दत्तात्रेय जाधव, प्रशांत वाघमोडे, रमेश खेडेकर, संत सोपानकाका सहकारी बँकेच्यावतीने विशेष सहकार्य करण्यात आले.

Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b02951 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..