पितृछत्र हरपलेल्या मुलांना शालेय साहित्य सासवडला एक हजार दप्तरांचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पितृछत्र हरपलेल्या मुलांना शालेय साहित्य
सासवडला एक हजार दप्तरांचे वाटप
पितृछत्र हरपलेल्या मुलांना शालेय साहित्य सासवडला एक हजार दप्तरांचे वाटप

पितृछत्र हरपलेल्या मुलांना शालेय साहित्य सासवडला एक हजार दप्तरांचे वाटप

sakal_logo
By

सासवड शहर, ता. २ : सासवड (ता. पुरंदर) येथील पुरंदर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत एक हजार दप्तरे व शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले.
दोन वर्षानंतर शाळा गजबजल्या पण अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तसेच कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे पितृछत्र हरपलेले आहे. अशा विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळणे अवघड जाईल हा मुद्दा घेऊन सासवड येथील जगताप प्रतिष्ठानच्या वतीने सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही मदत देण्यात येत आहे.
स्व.एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान हे नेहमी शैक्षणिक मदत करण्यात अग्रेसर असते दरवर्षी शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर गरीब व गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य तसेच सायकल वाटप प्रतिष्ठान मार्फत केले जाते. पुरंदर विद्या संकुलातील मुलांना मदत केल्याबद्दल प्राचार्य इस्माईल सय्यद यांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप यांचे आभार मानले.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप, नीरा मार्केट कमिटीचे संचालक भानुकाका जगताप, खासदार सुळे यांचे स्वीय सहाय्यक मयूर जगताप, सासवड नगरपालिका नगरसेविका मंगला म्हेत्रे, राष्ट्रवादी सासवड शहर महिला अध्यक्षा नीता सुभागडे, स्व. एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे सचिव शहाजी गरुड, नंदकुमार नावडकर, कुमोदिनी पांढरे आदी उपस्थित होते.

05337

Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b02960 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..