गुरोळी येथे वृक्षदिंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुरोळी येथे वृक्षदिंडी
गुरोळी येथे वृक्षदिंडी

गुरोळी येथे वृक्षदिंडी

sakal_logo
By

गराडे, ता. १४ ः पाचवी ते दहावीतील प्रत्येक विद्यार्थ्याला फळ रोपांचे गुरोळी (ता. पुरंदर) येथे वाटप करण्यात आले. "एक विद्यार्थी एक झाड" ही संकल्पना यावेळी राबवण्यात आली. "झाडे लावा झाडे जगवा" पर्यावरण वाचेल तर जग वाचेल, वृक्ष लावा दारोदारी समृद्धी होईल घरोघरी अशा घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी गावात जागृती केली.
येथील नामदेव गंगाराम शिंगाडे माध्यमिक विद्यालयांमध्ये शिवशक्ती सामाजिक सेवा ट्रस्ट, गुरोळी या संस्थेद्वारे वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायतचे उपसरपंच मधुकाका खेडेकर, सदस्य जीवन खेडेकर, वनाधिकारी पूनम जाधव, सहाय्यक वनपाल सूर्यकांत कुंजीर, बापू महाराज, मुख्याध्यापक अनिल क्षिरसागर, हरिश्चंद्र खेडेकर, अश्विनी काळे, विशाल खेडेकर, ऋतुराज खेडेकर, प्रशांत खेडेकर, सचिन खेडेकर, नाना पवार, मयूर खेडेकर, अक्षय मेमाणे, युवराज खेडेकर, सौरभ खेडेकर, सचिन खेडेकर, हेमंत खेडेकर, सचिन भंडलकर, अमोल माकर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या फळझाडांचे विद्यार्थ्यांनी रोपण करून त्या झाडाचा फोटो जीपीएस मॅप कॅमेरा लाइट या ॲपद्वारे झाडाचे जीपीएस लोकेशन घ्यायचे आहे व लावलेल्या झाडाचा फोटो लोकेशन सहित वर्ग शिक्षकांना पाठवायचा आहे. विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडाचे मॅपद्वारे सर्वेक्षण करून ज्या विद्यार्थ्यांनी झाडांचे चांगल्या प्रकारे रोपण केली आहे. अशा विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात येईल, असे संस्थेचे अध्यक्ष संतोष खेडेकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन घोलप व आभार सागर कोकाटे यांनी मानले.

Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b02988 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top