''दिगंबरा दिगंबरा''चा जयघोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''दिगंबरा दिगंबरा''चा जयघोष
''दिगंबरा दिगंबरा''चा जयघोष

''दिगंबरा दिगंबरा''चा जयघोष

sakal_logo
By

गराडे, ता. १३ : नारायणपूर (ता. पुरंदर) येथे गुरुपौर्णिमेनिमित्त पहाटे देवांना रुद्राभिषेक घालण्यात आला. त्यानंतर आरती, त्यानंतर होम हवन झाली. महर्षी व्यास यांच्या पादुकांचे दुपारी पूजन नारायणमहाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पोपट महाराज टेंबे यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले. यावेळी ''दिगंबरा दिगंबराचा'' जयघोष करण्यात आला.
गुरुपौर्णिमेनिमित्त लोणी काळभोर येथील मोहन काळभोर, देवाची उरुळी येथील कमलाकर साळुंखे, नायगाव येथील महेश लोखंडे व चिखली येथील मयूर पवार या यात्रेकरूंच्या हस्ते नारायण महाराज यांचे पूजन करण्यात आले. मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली होती.
पहाटेपासून पावसाने हजेरी लावली असतानाही भाविकांची मोठी गर्दी केली होती. साधारण लाखभर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला असल्याचे मंदिराचे व्यवस्थापक भरतनाना क्षीरसागर यांनी सांगितले.
यावेळी आमदार संजय जगताप, माजी आमदार उल्हास पवार, दादा वेदक, बाळासाहेब सोळसकर, नितीन भरगुडे पाटील, उद्योजक रामदास मेमाणे, पंढरपूर देवस्थानचे चेअरमन, मोरगाव देवस्थानचे गजानन पुजारी, बबनराव टकले, एम. के. गायकवाड, तात्यासाहेब भिंताडे, रवींद्र ताकवले, बाळासाहेब भिंताडे, अभिषेक भिंताडे, रामभाऊ बोरकर, अजित बोरकर, दादा भुजबळ आदी उपस्थित होते.


05397

Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b02990 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..