पुणे-बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे-बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन
पुणे-बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन

पुणे-बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन

sakal_logo
By

सासवड शहर, ता. १६ : महाराष्ट्रातील अग्रगण्य व नामांकित शैक्षणिक संस्था पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे राज्याचे विरोधी पक्ष नेते व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने शनिवारवाडा ते हडपसर सायकल रॅली आणि पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धा २०२२ चे शनिवार २३ जुलै रोजी आयोजन केले आहे.
पुणे ते बारामती सायकल स्पर्धेचे हे ७ वर्ष असून पुरुष गटासाठी पुणे ते बारामती (राष्ट्रीय व राज्यस्तर १२० किमी) आणि सासवड ते बारामती (राज्यस्तर, खुला गट ८५ किमी) तर १८ वर्षावरील मुलींसाठी माळेगाव ते बारामती (राष्ट्रीय स्तर १५ किमी) या प्रकारात सदर स्पर्धा होणार आहे. सोळा वर्षाखालील व १७ ते १८ वर्ष वयोगटातील मुले-मुली या दोन्ही गटांसाठी माळेगाव ते बारामती (१५ किमी) या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत विविध राज्यातील सुमारे ४५० स्पर्धक सहभागी होणार आहेत.
सायकल स्पर्धेत सहभागी सर्व वयोगटातील विजेत्यांना पाच लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार असून सर्व नोंदणीकृत खेळाडूंना सहभागाचे प्रमाणपत्र देणार आहे. दिवे घाट प्रथम पार करणाऱ्या स्पर्धकास ‘घाटाचा राजा’ हा पुरस्कार देण्यात येणार आहे. सायकल स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी सायकल असोसिएशन महाराष्ट्राचे प्रताप जाधव यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक ९३०९५५५०३०, ९४२२३३६८०८ येथे संपर्क साधावा. रॅलीकरिता https://forms.gle/JbtTXDhoWVUJB9dJ8 या गुगल फॉर्म लिंकद्वारे नोंदणी करण्याचे आवाहन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदीप कदम यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b02996 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..