
सासवडला उद्या मुख्यमंत्र्यांची सभा
सासवड शहर, ता. ३१ : राज्यात झालेल्या सत्ता परिवर्तनानंतर मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांची पश्चिम महाराष्ट्रातील पहिली सभा मंगळवारी, (ता. २) सासवड (ता. पुरंदर) येथील पालखीतळ मैदानावर होणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुंजवणी प्रकल्प, फुरसुंगी उरुळी पाणी योजना, हवेलीतील गावांचा अवाजवी टॅक्स आणि दिवे येथील राष्ट्रीय बाजार अशा विविध मुद्दे मार्गी लागण्याची चर्चा सभेत होणार आहे, असे शिवतारे यांनी सांगितले. सभेला मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ गुलाबराव पाटील, गुवाहाटी फेम आमदार शहाजी पाटील, खासदार श्रीरंग बारणे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आदी हे उपस्थित राहणार आहेत.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या पाठीशी माजी आमदारांपैकी सर्वात प्रथम पुरंदरचे आमदार विजय शिवतारे उभे राहिले होते. शिवतारे आणि शिंदे यांचे सख्य असल्याने उठावानंतर मध्यस्थी करण्याची तयारीही शिवतारे यांनी दर्शवली होती.
दरम्यान, पालखीतळ मैदानावर अनेक वर्षांनी सभा होत आहे. उद्धव ठाकरे यांची भव्य सभा याच मैदानावर झाली होती. कष्टकऱ्यांशी आपला संवाद व्हावा आणि म्हणून मुख्यमंत्र्यांच्या कल्पनेतून ''मुख्यमंत्री आपल्या दारी'' अशा प्रकारचे एक नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम म्हटला गेलाय. त्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थेट मुख्यमंत्री लोकांपर्यंत जातील. पत्रकार परिषदेस जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शहाजी बापूंच्या भाषणाकडे राहणार लक्ष
झाडी, डोंगार आणि हॉटेल डायलॉग फेम शहाजी बापू पाटील यांचे भाषण ऐकायला पुरंदर हवेलीत मोठी उत्सुकता दिसून येत आहे. सेनेची मुलूख मैदानी तोफ गुलाबराव पाटील हेदेखील मंगळवारी मैदान गाजवणार, अशी चर्चा तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये आहे. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले आहे.
८१३७२, २६०२
Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b03040 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..