पुरंदर शिष्यवृत्ती परीक्षेसाठी २३५२ जणांनी दिली परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरंदर शिष्यवृत्ती परीक्षेसाठी २३५२ जणांनी दिली परीक्षा
पुरंदर शिष्यवृत्ती परीक्षेसाठी २३५२ जणांनी दिली परीक्षा

पुरंदर शिष्यवृत्ती परीक्षेसाठी २३५२ जणांनी दिली परीक्षा

sakal_logo
By

सासवड शहर, ता. ३१ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित पुरंदर तालुक्यामध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पाचवीच्या १३९० तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आठवी ९६३ अशा एकूण २३५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
सासवड (ता. पुरंदर) येथे पुरंदर हायस्कूल या केंद्राचे केंद्रप्रमुख इस्माईल सय्यद यांनी विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास व्हावा, त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी व स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी. ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन केले.
पुरंदर तालुक्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेचे परीक्षा संचालक पुरंदर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नीलेश गवळी यांनी केले. तर समन्वयक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी पांडुरंग मेमाणे व बापू शिरसाठ आणि भरत जगदाळे परीक्षा यशस्वी संपन्न व्हावी, यासाठी प्रयत्न केले. आज मुलांमध्ये आणि पालकांमध्ये या परीक्षेसाठी एक उत्साहाचे वातावरण पाहण्यास मिळाले.

05499

Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b03041 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top