''रस्त्यांच्या निकृष्ट कामाबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''रस्त्यांच्या निकृष्ट कामाबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार''
''रस्त्यांच्या निकृष्ट कामाबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार''

''रस्त्यांच्या निकृष्ट कामाबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार''

sakal_logo
By

सासवड शहर, ता. १ : शहरात सासवड नगरपालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर विविध ठिकाणच्या रस्त्यांची कामे केली आहेत. ती अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याने महिन्याभरातच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. ही कामे करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपण निवेदन देणार असल्याचे भाजप सासवड शहराध्यक्ष शाखेत साकेत जगताप यांनी सांगितले.
सासवड (ता. पुरंदर) येथे नगरपालिका ते हुंडेकरी चौक असा रस्ता पालखी काळात केला होता. या रस्त्याला खड्डे पडल्यामुळे ते बुजविण्याचे काम नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले. पण त्यानंतर रस्त्यावर बांधकामासाठी वापरली जाणारी कच टाकण्यात आली. यामुळे रस्त्यावर धुळीचे प्रमाण वाढल्यामुळे या परिसरातील दुकानदारांना श्वास घेणे अवघड झाले आहे. यामुळे नागरिकांना मास्क वाटप करण्यात आला.
यावेळी आनंद जगताप, अमोल जगताप, समीर कामठे, दिलीप जगताप, प्रदीप बोत्रे, लक्ष्मण धर्माधिकारी, सचिन जगताप, विक्रांत नाळे, निखिल जगताप आदी उपस्थित होते.


05504

Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b03043 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..