सासवड शिक्षण मंडळ सेवक पतसंस्थेतर्फे ८ टक्के लाभांश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सासवड शिक्षण मंडळ सेवक
पतसंस्थेतर्फे ८ टक्के लाभांश
सासवड शिक्षण मंडळ सेवक पतसंस्थेतर्फे ८ टक्के लाभांश

सासवड शिक्षण मंडळ सेवक पतसंस्थेतर्फे ८ टक्के लाभांश

sakal_logo
By

सासवड शहर, ता. २ ः सासवड नगरपालिका शिक्षण मंडळ सेवक, सहकारी पतसंस्थेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच सावित्रीबाई फुले कन्या प्रशाला शाळा क्र.२ येथे आयोजित करण्यात आली होती. सरस्वती पूजन करून सभेच्या पहिल्या सत्राची सुरुवात करण्यात आली. सभापती हेमा सुनील शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या वार्षिक सभेत सभासदांना ८ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. दहावी-बारावी, स्पर्धा परीक्षा गुणवंत विद्यार्थी सत्कार व सेवापूर्तीनिमित्त संपूर्ण पोशाख देऊन कल्पना दिलीप काटे व सविता दत्तात्रेय पाटसकर यांनाही सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी संचालक चंद्रकांत कुंजीर, दत्तात्रेय खेडेकर, ललिता कुंजीर, अरुणा नवगिरे, उज्ज्वला कुंजीर, आशालता भोंगळे, हेमा शिंदे, राज्य नेते शिवाजी राजीवडे, संघटना अध्यक्ष नारायण किसन चौधरी, अनिल कांबळे, राजेंद्र लांघी, संजय कांबळे, संतोष देवकर सर्व सभासद शिक्षक बंधू -भगिनी उपस्थित होते.
कर्जावरील व्याजदर ९. ७५ टक्के करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. तातडीची कर्जाची मर्यादा वाढविण्यात आली. सभेतील सर्व विषय एकमताने यावेळी मंजूर करण्यात आले. अहवालाचे वाचन सोसायटीचे सचिव प्रकाश जगताप यांनी केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b03045 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..