पतीच्या अतिक्रमणामुळे पत्नीचे सदस्यत्व अपात्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पतीच्या अतिक्रमणामुळे 
पत्नीचे सदस्यत्व अपात्र
पतीच्या अतिक्रमणामुळे पत्नीचे सदस्यत्व अपात्र

पतीच्या अतिक्रमणामुळे पत्नीचे सदस्यत्व अपात्र

sakal_logo
By

सासवड शहर, ता. ६ : पतीने सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्यामुळे गुरोळी (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायत सदस्या सोनाली अनंता खेडेकर यांचे ग्रामपंचायत सदस्यपद जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अपात्र ठरवले.
गुरोळी येथील गट नंबर ७६६ पैकी काही भाग पाझर तलावासाठी संपादित झाला आहे. मात्र, गुरोळी येथील ग्रामपंचायत सदस्या सोनाली खेडेकर यांचे पती अनंता रामचंद्र खेडेकर यांनी या गट नंबर ७६६ मधील ०.०२ आर क्षेत्र विहीर खोदाईसाठी जमीन खरेदी केली. ती पाझर तलावासाठी संपादित होती, हे माहीत असूनही विहीर खोदाई करून या जागी अतिक्रमण केले. त्यामुळे सोनाली खेडेकर यांचे सदस्यपद रद्द करावे, अशी मागणी गुरोळी येथील हर्षा प्रमोद शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
याबाबत छोटे पाटबंधारे उपविभाग सासवड यांनी दिलेल्या पत्रानुसार पाझर तलावासाठी संपादित क्षेत्रामध्ये विहीर खोदलेली आहे. तसे मोजणी नकाशामध्ये दिसून येत आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून व कागदपत्रे पाहून सोनाली खेडेकर यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व अपात्र ठरवले.

Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b03053 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..