पिसर्वे येथील जमिनीचे फसवणुकीने खरेदीखत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिसर्वे येथील जमिनीचे
फसवणुकीने खरेदीखत
पिसर्वे येथील जमिनीचे फसवणुकीने खरेदीखत

पिसर्वे येथील जमिनीचे फसवणुकीने खरेदीखत

sakal_logo
By

सासवड शहर, ता. ६ : दोघांत मिळून इंग्लिश मीडियम स्कूल काढू, असे खोटे सांगून पिसर्वे (ता. पुरंदर) येथील शेतजमिनीचे खरेदीखत करून घेतल्याप्रकरणी संग्राम शिवाजी कोलते (वय ४०) यांच्या फिर्यादीवरून शिवाजी गुलाब कोलते (रा. सोपाननगर, सासवड) यांच्या विरोधात सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संग्राम कोलते यांनी फिर्याद दिली की, शिवाजी गुलाब कोलते यांनी ७ सप्टेंबर २०११ रोजी सासवड येथे माझे वडील शिवाजी राघू कोलते यांना, ‘तुमच्या पिसर्वे येथील शेतजमीन गट क्रमांक ५१२ मधील २७.८७५ आर या क्षेत्रावर इंग्लिश मीडियम स्कूल दोघांत मिळून काढू,’ असे खोटे सांगून खरेदीखत करून घेतले. मात्र, अद्यापपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल उभारण्याचे कोणतेही स्वरूपाचे काम न करता त्यांनी माझ्या वडिलांची फसवणूक केली आहे. याबाबतचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे करीत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b03054 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..