दिवे येथे मोहरम सण उत्साहात साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवे येथे मोहरम सण उत्साहात साजरा
दिवे येथे मोहरम सण उत्साहात साजरा

दिवे येथे मोहरम सण उत्साहात साजरा

sakal_logo
By

गराडे, ता. १२ ः दिवे (ता.पुरंदर) येथे इस्लामिक नवीन वर्ष प्रारंभ दिवशी दहा दिवस हसेन हुसेन यांच्या शहीद दिनाच्या निमित्ताने ताबूत तयार करण्यात आला होता. मोहरमच्या दिवशी ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर ताबूताचे विसर्जन करण्यात आले. यावेळी हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडले. मुस्लिम समाजबांधवांनी मोहरम हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
यावेळी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हरघर तिरंगा उभारण्याबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी गणीभाई मुलाणी, सादिक मुलाणी, शाहरुख मुलाणी, अब्दुल मुलाणी, शकिल मुलाणी, मुन्नाभाई मुलाणी, रमजान मुलाणी, सिराज मुलाणी, बशीर सय्यद, शब्बीर सय्यद, जावेद शेख, युनूस सय्यद, इकबाल शेख, अमन शेख व सर्व समाजबांधव व दिवेकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b03067 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..