‘गोविंदा रे, गोपाळा’चा कानिफनाथ गडावर जयघोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गोविंदा रे, गोपाळा’चा 
कानिफनाथ गडावर जयघोष
‘गोविंदा रे, गोपाळा’चा कानिफनाथ गडावर जयघोष

‘गोविंदा रे, गोपाळा’चा कानिफनाथ गडावर जयघोष

sakal_logo
By

गराडे, ता. १९ ः बोपगाव (ता. पुरंदर) येथील कानिफनाथगड येथे गोकुळाष्टमीनिमित्त हजारो भाविकांच्या उपस्थितीत २ वाजता देवाचे भक्त सर्जेरावनाना जगदाळे यांनी दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कानिफनाथ भक्तांनी ‘गोविंदा रे, गोपाळा’चा जयघोष केला.
आज पहाटे कानिफनाथ मंदिरात देवांना अभिषेक घालण्यात येऊन महापूजा झाली. त्यानंतर पहाटेची नाथांची आरती झाली. सकाळी बोपगाव येथून निघालेल्या दिंडीचे कानिफनाथगडावर स्वागत करण्यात आले. त्यानंतर दुपारी १२ वाजताची नाथांची आरती होऊन कानिफनाथ मित्र मंडळाच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. तसेच भजनाचा कार्यक्रम झाल्याची माहिती ट्रस्टचे संचालक दीपक फडतरे यांनी दिली.
दहीहंडी उत्सवाचे नियोजन यावेळी अध्यक्ष ज्ञानोबा फडतरे, उपाध्यक्ष नामदेव फडतरे, सचिव जयवंत फडतरे, खजिनदार आनंदराव फडतरे, संचालक शिवाजी जगदाळे, प्रकाश का. फडतरे, नितीन फडतरे, रमेश फडतरे, प्रकाशअप्पा फडतरे, दीपक फडतरे, सुरेश फडतरे, नागेश फडतरे, महादेव फडतरे, व्यवस्थापक संतोष गोफणे, पांडुरंग बाठे यांनी केले.
यावेळी उद्योजक दयानंद फडतरे, सरपंच संजीवनी फडतरे, उपसरपंच स्वाती फडतरे, सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक अशोक जगदाळे, रायबा जगदाळे, बबन जगदाळे, बाळासाहेब फडतरे, दादा जगदाळे, उत्तम फडतरे, नमन फडतरे, अशोक फडतरे, शिवाजी फडतरे, योगेश फडतरे, संदीप फडतरे आदी उपस्थित होते.
दुपारी मंदिरात आरती झाली. त्यानंतर छबिना निघाला. यानंतर ढोल लेझीमच्या तालावर उपस्थित भाविकांनी ठेका धरला. सायंकाळी बोपगाव येथून निघालेली दिंडी कानिफनाथ गडावरच्या दहीहंडी कार्यक्रमानंतर पुन्हा बोपगावला परतली. गावात आल्यानंतर येथे गावचा दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम झाला.
5604

Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b03093 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..