सासवडमध्ये ठेकेदार मस्तावल्याचे चित्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सासवडमध्ये ठेकेदार मस्तावल्याचे चित्र
सासवडमध्ये ठेकेदार मस्तावल्याचे चित्र

सासवडमध्ये ठेकेदार मस्तावल्याचे चित्र

sakal_logo
By

सासवड शहर, ता. २७ : ''''सासवड शहरातील अनेक रस्त्यांची कामे निकृष्ट झाली आहेत. यामधील काही रस्ते पंधरा दिवसातच वाहून गेले. काहीचे रस्ते डांबरीकरण केल्यानंतर त्याची दुरुस्ती आहे. यामुळे थेट नगरपालिकेचे मोठे नुकसान झाले असून ठेकेदार मस्तावले असल्याचे विदारक चित्र सद्या नगरपालिकेत आहे,'''' असा आरोप शिंदे गटाचे सासवडचे शिवसेना नेते सूरज जगताप यांनी आरोप केला आहे.
सासवड (ता. पुरंदर) येथील विजय शिवतरे यांच्या पक्ष कार्यालयात शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली सूरज जगताप व मंदार गिरमे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सासवड नगरपालिकेवर निशाणा साधला. पालिकेच्या होत असलेल्या कामांचा दर्जा तपासावा, अशी मागणी केली आहे.
सासवड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये असणारा सिद्धेश्वर रस्ता हा आम्ही अनेक वेळा आंदोलने तर या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून निषेध आंदोलनही केले होते. यामुळे हा प्रश्न मार्गे लागला तर आंदोलनानंतर सासवडनगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी सिद्धेश्वर रस्त्याच्या संदर्भात निधी मंजूर झाल्याचे पत्र प्रसिद्ध केल्याचे जगताप यांनी सांगितले.

सासवड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये सुरू असलेले रस्ते पालखी जाण्यापूर्वी केले व पालखी परत येईपर्यंत ते वाहून गेले. त्यानंतर या रस्त्यांची दुरुस्ती करत रस्त्यावर बांधकामाची डस्ट वापरली. यामुळे दुकानदार, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नगरपालीकेने ठेकेदारांचे हित जपण्यापेक्षा नागरिकांच्या सुविधेकडे अधिक लक्ष वेधावे, असे युवा सेनेचे तालुका प्रमुख मंदार गिरमे यांनी सांगितले.

सासवड येथील भाजी बाजाराची अत्यंत दुरवस्था झाली आहे. सातत्याने बाजार विविध ठिकाणी नेला जात आहे. तसेच साठेनगर, इंदिरानगर, सासवडच्या गावठाणामधील अनेक नागरिकांना आजाराने ग्रासलेले असताना देखील नगरपालिका कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही, असे गिरमे यांनी सांगितले.
यावेळी सासवड शहर उपाध्यक्ष ओमकार जगताप, युवासेना सासवड शहर प्रमुख सूरज माने, सुरेश पाटील उपस्थित होते.


सिद्धेश्वर रस्त्यासाठी निधी मंजूर झाला असून, टेक्निकल बाबीनंतर काम सुरू होईल. सासवड नगरपालिका ते हुंडेकरी चौक या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे तातडीने तात्पुरते खड्डे बुजून घेतले. रस्ता दुरुस्तीची कामे ठेकेदाराच्या मुदतीत करून घेतली जात असल्यामुळे नगरपालिकेचे यात काही नुकसान नाही
- निखिल मोरे, मुख्याधिकारी, सासवड नगरपालिका

Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b03121 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..