सासवडमध्ये शिक्षकांची निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सासवडमध्ये शिक्षकांची निदर्शने
सासवडमध्ये शिक्षकांची निदर्शने

सासवडमध्ये शिक्षकांची निदर्शने

sakal_logo
By

सासवड शहर, ता. ०१ ः गंगापुरचे आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत शिक्षकांच्या बाबतीत केलेली वक्तव्ये शिक्षकांचा अपमान करणारी असल्याच्या निषेधार्थ तसेच, शासनाने ‘आमचे गुरुजी’ या उपक्रमांतर्गत शिक्षकांचे फोटो भिंतीवर लावण्याचे अनाकलनीय व अतार्किक आदेश दिले आहेत. या दोन्ही विषयांविरोधात पुरंदर तालुक्यातील तमाम शिक्षक संघटना एकत्रित येत शनिवारी ३ सप्टेंबर रोजी निषेध व्यक्त करणार असल्याची माहिती समन्वय समितीचे अध्यक्ष नंदकुमार सागर यांनी दिली.
ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेतील शिक्षक मुख्यालयी राहाण्याबाबतचा शासन निर्णय रद्द झाला असताना देखील शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत. याबाबत खोटे दाखले देऊन शिक्षक घरभाडे वसूल करतात, असे विधान बंब यांनी केले होते. या निषेधार्थ हे निदर्शने केले जाणार आहेत.
तसेच, सध्या राज्यातील शासक व प्रशासक यांच्याकडून शैक्षणिक गुणवत्ता वाढ व सुधारणांबाबत निरर्थक निर्णय घेतले जात आहेत. २४ ऑगस्ट २०२२ रोजी शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी व्हीसीद्वारे सर्व शिक्षणाधिकारी यांना शिक्षकांचे रंगीत फोटो वर्गात भिंतीवर लावण्याचे आदेश दिले. शिक्षकांच्या प्रतिमा भिंतीवर टांगून शिक्षकांची प्रतिष्ठा व स्वाभिमान यास शासन कोणत्या प्रकारे अवमानित व सार्वजनिक चेष्टेचा विषय बनवित आहे. याचे भान संबंधितांना नसल्याचे हे उदाहरण आहे. आम्ही फ्रेममधील बंदिवान शिक्षक नाहीत. आमचे गुरुजी हा बालिश निर्णय रद्द करावा. यासाठी पुरंदरमधील सर्वच शिक्षक एकत्र येत निदर्शने व निषेध व्यक्त करणार आहोत, असे नंदकुमार सागर म्हणाले.

Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b03144 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..