बंब यांच्या वक्तव्याचा शिक्षकांकडून निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंब यांच्या वक्तव्याचा शिक्षकांकडून निषेध
बंब यांच्या वक्तव्याचा शिक्षकांकडून निषेध

बंब यांच्या वक्तव्याचा शिक्षकांकडून निषेध

sakal_logo
By

सासवड शहर, ता. ४ :"शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत त्यांना घरभाडे देय नाही. शिक्षक खोटी कागदपत्रे सादर करून घरभाडे घेतात. शिक्षकांना किंवा शासकीय सेवकांना घरभाडे मिळण्यासाठी नोकरीच्या ठिकाणी निवास असला पाहिजे, अशी सक्ती नाही. त्यामुळे आमदार बंब यांनी चुकीची विधाने करून शिक्षकांची बदनामी केली आहे,'''' असे पुणे जिल्हा मध्यामिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर यांनी सांगितले.
सासवड (ता. पुरंदर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे पुरंदर तालुका मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर, प्राथमिक शिक्षक समन्वय समिती यांच्या वतीने पुरंदर तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष नंदकुमार सागर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विधानसभा सदस्य प्रशांत बंब यांनी मागील आठवड्यात जे बेताल वक्तव्य केले. तसेच शिक्षकांवर जे बिनबुडाचे आरोप केले. त्यांच्या निषेधार्थ जाहीर निषेध सभा घेण्यात आली.
"आमचे गुरुजी” या उपक्रमांतर्गत शिक्षकांचे फोटो भिंतीवर लावण्याचे अनाकलनीय व अतार्किक आदेश दिले आहेत. हा बालिश निर्णय रद्द करावा, असे मुंबई सेकंडरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे यांनी सांगितले.
केवळ मतदान प्रक्रिया मतमोजणी आणि त्यासंबधित प्रशिक्षण वगळता शिक्षकांना इतर अशैक्षणिक कामात गुंतवू नका. शिक्षण क्षेत्रात खाजगीकरण किंवा बाजारीकरण चालले आहे. विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यीत शाळांचे हितसंबंध जोपासण्यासाठी महाराष्ट्रातील सार्वजनिक व सरकारी शिक्षण व्यवस्था हेतुपुरस्सर बदनाम केली जात आहे असे कुंडलिक मेमाणे यांनी सांगितले.
मुंबई सेकंडरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे, राजाभाऊ जगताप, राजाभाऊ जगताप व तानाजी फडतरे, महादेव माळवदकर, कुंडलिक मेमाणे, संजय लवांडे, तानाजीराव फडतरे, मधुबाला कोल्हे आदी मान्यवर मंडळींनी आपले मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचलन पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले यांनी केले.पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव दत्तात्रेय रोकडे यांनी आभार मानले.

05738

Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b03157 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..