सिंगापूर येथे उरसळ यांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंगापूर येथे उरसळ यांना अभिवादन
सिंगापूर येथे उरसळ यांना अभिवादन

सिंगापूर येथे उरसळ यांना अभिवादन

sakal_logo
By

गराडे, ता. ११ : "कै. शंकरराव उरसळ १९५४ मध्ये पुणे महानगरपालिकेचे सर्वात तरुण महापौर (वय २७) म्हणून निवडून आले होते. तर १९६२ मध्ये ते पुणे जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष झाले. सलग दोन वेळा त्यांना हा बहुमान मिळाला होता. त्यांचा १९६२ ते ७२ हा अध्यक्षपदाचा १० वर्षाचा कालखंड पुणे जिल्ह्याच्या विकासात नोंद घेणारा ठरला,'''' असे सरपंच संगीता वारे यांनी सांगितले.
सिंगापूर (ता. पुरंदर) येथे ग्रामस्थ व पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळ वाघापूर यांनी लोकनेते कै. उरसळ याची जयंती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन साजरी केली. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विकास व जडणघडणीत कै. अण्णासाहेबांचे योगदान मोठे होते. अण्णासाहेब हे १९६५ ते १९८२ या कालावधीत १७ वर्षे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार होते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्थापक आदरणीय कै. बाबुरावजी घोलपसाहेब यांच्या निधनानंतर १९८२ ते १९८६ या काळात कै. अण्णासाहेब संस्थेचे मानद सचिव म्हणून देखील कार्यरत होते. त्यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आणि सासवड येथील वाघीरे महाविद्यालयाच्या स्थापना व विकासासाठी महत्वपूर्ण असे योगदान दिले, असे प्राचार्य राहूल येळे यांनी सांगितले.
यावेळी सिंगापूरच्या सरपंच संगीता वारे, उपसरपंच सौरभ लवांडे, चांगुणा वाघमारे, विशाल लवांडे, विक्रांत पवार, हनुमंत वारे, श्रीहरी लवांडे, सुरेश लवांडे, दिलीप वारे एकनाथ वारे, माऊली वारे, शांताराम लवांडे, बाळासाहेब कोरडे, दशरथ लवांडे, शालिनी लोणकर, पंढरीनाथ काळे, राहूल येळे, धुळाजी पवार आदी उपस्थित होते.

05775

Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b03174 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..