आवडीप्रमाणे शिक्षणाचा धोरणात विचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आवडीप्रमाणे शिक्षणाचा धोरणात विचार
आवडीप्रमाणे शिक्षणाचा धोरणात विचार

आवडीप्रमाणे शिक्षणाचा धोरणात विचार

sakal_logo
By

सासवड शहर, ता. १३ : ‘‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ३४ वर्षांनी सन २०२० मध्ये संमत झाले. असे असले तरी या धोरणामध्ये सर्वंकष विचार करून शिक्षण स्वतःच्या आवडीप्रमाणे प्रत्येकापर्यंत पोहचले पाहिजे, हा विचार केला आहे. या धोरणाचे उद्दिष्टच शिक्षणातून पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान या मूलभूत क्षमता आणि त्याबरोबरच चिकित्सक विचार, समस्यांचे निराकरण करण्याची अतिउंच क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करून विद्यार्थ्यांत नैतिक, सामाजिक व भावनिक प्रवृत्ती निर्माण करणे, हे आहे. त्यामुळे शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांप्रति संवेदनशील होऊन त्यांना शिक्षण देणे गरजेचे आहे,’’ असे मत सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी कृष्णकांत चौधरी यांनी व्यक्त केले.
पिंपळे (ता. पुरंदर) येथील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे विद्यालयात संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे ग्रामीण व पुरंदर तालुका मुख्याध्यापक संघ व शिक्षक संघ यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या कार्यशाळेचे उद्‍घाटन चौधरी यांच्या हस्ते केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे ग्रामीणचे अध्यक्ष विजय कोलते, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी दत्तात्रेय गवळी, अविनाश ताकवले यांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी तालुक्यातील मुख्याध्यापक मधुकर सकुंडे (वाघापूर), जालिंदर जगताप (जेऊर), पांडुरंग पाटील (काळदरी), गुलाबराव बोराटे (दिवे); तर शिक्षक योगिनी शेवते (परिंचे), प्रगती मेमाणे (पानवडी), वैशाली यादव (वनपुरी), छाया पोटे (जेजुरी), रोहिदास इंगळे (खळद), सुनील जाधव (माळशिरस), विनय तांबे (नीरा), लक्ष्मण गोळे (जवळार्जुन), संजय शेडगे (हिवरे), रमेश जाधव (पिंपळे), मोहनलाल निगडे (जवळार्जुन), नियोजन ताकवले (यादववाडी) यांना उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित केले.
या कार्यक्रमास शांताराम पोमण, कुंडलिक मेमाणे, बाळासाहेब मुळीक, संजय धुमाळ, प्रल्हाद कारकर, मधुकर जगताप आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शिवाजी घोगरे यांनी प्रास्ताविक; तर दत्तात्रेय रोकडे व सचिन धनवट यांनी सूत्रसंचालन केले. वसंत ताकवले यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b03178 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..