नारायणपूर येथे देवांच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नारायणपूर येथे देवांच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा
नारायणपूर येथे देवांच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा

नारायणपूर येथे देवांच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा

sakal_logo
By

गराडे, ता. ६ : नारायणपूर (ता. पुरंदर) येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात घट उठविण्याच्या कार्यक्रमानंतर दसऱ्याच्या दिवशी दुपारी पालखीत मुखवटे व पादुका ठेवून ग्रामप्रदक्षिणेने गुलालाची उधळण करीत दसरा सण उत्साहात साजरा करण्यात आला. सद्‌गुरु नारायण महाराज व पोपट महाराज बोरकर यांना सोने (आपटा) देत आबालवृद्धांनी आशीर्वाद घेतले.

पहाटे काळभैरवनाथ मंदिर, नारायणेश्वर मंदिर व दत्त मंदिरात देवांना पंचामृताने अभिषेक घालण्यात आले. त्यानंतर दिवसभर श्रींचे महाराष्ट्र राज्यातील अनेक भाविकांनी दत्त मंदिरात दर्शनाचा लाभ घेतला. दुपारी आरती झाल्यानंतर दुपारी एक वाजता ढोल, ताशा व सनईच्या गजरात पालखीने ग्रामप्रदक्षिणेला सुरुवात केली. भिवडी शिव, नारायण पेठ, चिव्हेवाडी शिव, जुना काळभैरबा या ठिकाणी पालखी जाऊन आल्यानंतर गुलालाची उधळण करीत ग्रामप्रदक्षिणा होऊन पालखी मंदिरात आली. या ठिकाणी पालखीची देव भेट झाली तसेच रात्री ग्रामप्रदक्षिणा होत असताना पालखी चौकात भाकणूक झाली.
दसरा सणाच्या या सोहळ्यात दत्त मंदिराचे व्यवस्थापक भरतनाना क्षीरसागर, माजी सरपंच रामभाऊ बोरकर, सरपंच चंद्रकांत बोरकर, उपसरपंच प्रज्ञा बोरकर, श्रीनाथशेठ बोरकर, शिवाजी बोरकर, चंद्रकांत बोरकर, प्रदीप बोरकर, सदानंद बोरकर, अजित बोरकर, नितीन झेंडे, अरुण बोरकर, मारुती बोरकर, भुजंग बोरकर, माधव बोरकर, रामदास बोरकर आदींनी सहभाग घेतला. विलास खोरघडे व सुनील क्षीरसागर यांनी पुजारी म्हणून मंदिरात देवांची फुलांची छान सजावट केली.


05980