''नाथसाहेबांचं चांगभलं''च्या जयघोषामध्ये सोन्याची लूट ''नाथसाहेबांचं चांगभलं''च्या जयघोषात सोन्याची लूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''नाथसाहेबांचं चांगभलं''च्या जयघोषामध्ये सोन्याची लूट
''नाथसाहेबांचं चांगभलं''च्या जयघोषात सोन्याची लूट
''नाथसाहेबांचं चांगभलं''च्या जयघोषामध्ये सोन्याची लूट ''नाथसाहेबांचं चांगभलं''च्या जयघोषात सोन्याची लूट

''नाथसाहेबांचं चांगभलं''च्या जयघोषामध्ये सोन्याची लूट ''नाथसाहेबांचं चांगभलं''च्या जयघोषात सोन्याची लूट

sakal_logo
By

गराडे, ता. ६ : कोडीत (ता. पुरंदर) येथे श्रीनाथ म्हस्कोबा देवाची पालखी माळावरील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात आल्यानंतर नाथांच्या शस्त्राने (तलवारीने) कासवावरील आपट्याला स्पर्श करताच भाविकांनी सोन्याची लुट करीत ''नाथसाहेबांचं चांगभलं''च्या जयघोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत दसरा उत्साहात पार पडला.
पहाटे देवघरातील देवांना अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर मंदिर भाविकांना खुले करण्यात आले. दुपारी चार वाजता देवघरातील पादुका व मुखवटे पालखी ठेवून पालखी काठीने सर्व मानकरी व डागिनदार यांच्यासह वाजत गाजत माळावर असलेल्या श्रीनाथ म्हस्कोबा मंदिराकडे प्रस्थान ठेवले. चार वाजता पालखी माळावरील मंदिरात पोहोचली.
येथील कासवा शेजारी पालखी थांबल्यानंतर आपटे पूजन मानकरी व मुकादम मंडळी यांच्याकडून करण्यात आले. त्यानंतर नाथांच्या तलवारीने म्हणजे आपट्याला शस्त्र
लावून सोने लुटण्याचा प्रमुख सोहळा पार पडला. त्यानंतर पालखी काठी यांची मंदिर प्रदक्षिणा झाली. यावेळी छबिण्याचा कार्यक्रम झाला. कळसाच्या शिखराला काठी भेट होऊन मंदिर प्रदक्षिणा झाली. यावेळी मंदिरात आरती घेण्यात आली. त्यानंतर पुन्हा आलेल्या मार्गाने पायी पालखी देवघरात आल्यानंतर आरती होऊन पालखी विसावली. यावेळी ग्रामस्थांनी आपटा देत भेटीचा कार्यक्रम केला.

05983