गद्दारांना मतदारच जागा दाखवतील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गद्दारांना मतदारच जागा दाखवतील
गद्दारांना मतदारच जागा दाखवतील

गद्दारांना मतदारच जागा दाखवतील

sakal_logo
By

सासवड शहर, ता. ९ : ''''काल खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील ४० गद्दारांनी महाराष्ट्रातील जनता बाळासाहेबांना मानणारा शिवसैनिक हा कदापिही माफ करणार नाही. किंबहुना वेळ आल्यावर लोकशाही पद्धतीने तालुक्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक त्यांची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही,'''' असे पुणे जिल्हा शिवसेनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र काळे यांनी ठणकावून सांगितले.
सासवड (ता. पुरंदर) येथील शिवतिर्थावर शिवसेना सोडून गेलेल्या गद्दारांच्या विरोधात पुरंदर तालुका शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख अभिजित जगताप, पंचायत समितीचे माजी सभापती रमेश जाधव, संघटक राजेश खेनट, सोमनाथ खळदकर, संकेत जाधव, आकाश जगताप, अक्षय गायकवाड, विजय कुंभारकर, राहुल यादव, दीपक बनकर, अप्पा सकट, नीलेश गिरमे, राजेंद्र धोत्रे, राजेंद्र कुदळे, दीपक दळवी, गणेश वाघ, संजय खैरे, बाळासाहेब खैरे, संतोष भोसले, सचिन देशमुख, राजाभाऊ क्षीरसागर, दत्ता गाडेकर, शांताराम जगदाळे, राजेंद्र कुदळे, वैभव कोलते आदी उपस्थित होते.
एकूणच महाशक्ती, सुप्रिम कोर्ट किंबहुना निवडणूक आयोगाच्या आडदडून, त्यांना हाताशी धरून म्हणण्यापेक्षा ज्या काही तांत्रिक बाबींची सोंग ढोंगं करीत. तसेच तांत्रिक बाबींचा वापर करून सगळ्या खोट्या गोष्टी समोर करून जो काल निवडणूक आयोगाने निर्णय दिला. खरंतर आम्ही निवडणूक आयोगा बाबतीत किंबहुना सुप्रिम कोर्टा बाबतीत आम्हाला काही बोलायचं नाही. जे काही पुरावे त्यावर आधारित त्यांनी काय निर्णय दिले असतील. पणया गद्दारांनी खऱ्या अर्थाने शिवसेना संपवायचे काम यांनी केले. त्यांना त्यांची जागा दाखविणारच असे राजेंद्र काळे यांनी सांगितले.
सासवड शहर प्रमुख राजेंद्र जगताप यांनी प्रास्ताविक तर शहर प्रमुख कुणाल जगताप यांनी सूत्रसंचालन केले.

06004